Tips to Control Hypertension: हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे, घरच्या घरी फुकट करा उपचार, डॉक्टरही होतील आश्चर्यचकीत
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Home remedies to Control Hypertension in Marathi: उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लडप्रेशर किंवा हायपरटेन्शन हा सुद्धा डायबिटीसप्रमाणे एक जीवघेणा आजार ठरू लागलाय. गेल्या शतकापर्यंत फक्त वृद्धांना किंवा मध्यमवयीन व्यक्तींना होणारा रक्तदाबाचा त्रास आता तरूणांनाही होऊ लागलाय. जाणून घेऊयात हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी करण्यासाठीचे काही सोपे घरगुती उपाय.
मुंबई : उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लडप्रेशर किंवा हायपरटेन्शन हा सुद्धा डायबिटीसप्रमाणे एक जीवघेणा आजार ठरू लागलाय. गेल्या शतकापर्यंत फक्त वृद्धांना किंवा मध्यमवयीन व्यक्तींना होणारा हाय ब्लडप्रेशरचा त्रास आता तरूणांनाही होऊ लागलाय. ताणतणाव, अपुरी झोप किंवा अवेळी झोपणं, जास्त मसालेदार, तळलेले पदार्थ खाणे आणि व्यायाम न करणे, ही उच्च रक्तदाबाची प्रमुख कारणं मानली जातात. हाय ब्लडप्रेशरने आत्तापर्यंत अनेक कॉलेजवयीन युवकांचा बळी घेतलाय. त्यामुळे हाय ब्लडप्रेशर किंवा उच्चदाबाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरतं. हाय ब्लड प्रेशरच्या त्रासावर बाजारात अनेक गोळ्या औषधं उपलब्ध आहेत. काही महाग आहेत तर काही स्वस्त. असं असलं तरीही या औषधांचे दुष्परिणाम सुद्धा आहेत. डायट फॉर डिलाइट क्लिनिक वरिष्ठ आहारतज्ञ खुशबू शर्मा काही घरगुती उपायांची, पदार्थांची माहिती देत आहेत. जे केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होईल.
त्यापूर्वी जाणून घेऊयात रक्तदाब म्हणजे नेमकं काय आणि तो त्रास कशामुळे होतो ?

आपलं हृदय धमन्यांद्वारे संपूर्ण शरीरात रक्त पाठवतं. शरीरातील सर्व अवयवांचे कार्य सुरळीत पार पडण्यासाठी ठराविक दाबाने रक्तप्रवाह आवश्यक असतो. परंतु रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की त्याचा रक्ताभिसरणावर परिणाम होऊ लागतो. रक्तवाहिन्यांमधील दाब वाढून उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते आणि हा दाब जेव्हा कमी होतो तेव्हा कमी रक्तदाब म्हणजेच लो-बीपीचा त्रास सुरू होतो.
advertisement
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे काही 6 सोपे घरगुती उपाय / पदार्थ :
1) लसूण: आहारतज्ञ खुशबू शर्मा सांगतात की, उच्च रक्तदाब राखण्यासाठी लसूण हे सर्वोत्तम आहे. गेल्या अनेकांना लसून चावून खायला आवडतं. लसून खाल्ल्याने आपल्या शरीरात नायट्रिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाणे फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
2) बदाम : बदाम हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. बदामात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर्स भरपूर प्रमणात आढळून येतात. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून रक्ताभिसरण सुधारायला मदत होते. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य आपसूकच चांगलं राहतं.
advertisement
3) फळं: स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रासबेरी आणि ब्लॅकबेरीमध्ये फ्लेव्होनॉइड्स मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम मिळतो. याशिवाय केळी आणि किवीच्या सेवनाने हायब्लडप्रेशर कंट्रोल व्हायला मदत होते.
4) ग्रीक योगर्ट: आहारतज्ञांच्या मते, ग्रीक योगर्ट हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. त्यात असलेल्या कॅल्शियम, पोटॅशियम आणि अनेक खनिजांमुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
advertisement
5) हिरव्या भाज्या : हिरव्या भाज्यांमध्ये असलेल्या विविध पोषकतत्त्वांमुळे शरीराला फायदे होतातच. मात्र या भाज्यामध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या नायट्रेट्समुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
6) ओट्स : वजन कमी करण्यासाठी आणि डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी ओट्स खाणं फायद्याचं आहेच. याशिवाय ओट्स खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहायला मदत होते. ओट्समध्ये असलेले बीटा ग्लुकेन आणि फायबरमुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवायला मदत करतात.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 25, 2025 2:48 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tips to Control Hypertension: हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे, घरच्या घरी फुकट करा उपचार, डॉक्टरही होतील आश्चर्यचकीत











