जाणून घेऊयात शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असल्यावर कोणती लक्षणं दिसतात.
अनियंत्रित हृदयाचे ठोके : आधी सांगितल्याप्रमाणे कमी श्रमाचं काम करूनही थकवा येत असेल किंवा तुमच्या हृदयाच्या ठोक्यांची गती अनियंत्रित असेल, तर हे हृददाबासोबतच मॅग्नेशियमच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. कारण मॅग्नेशियम हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण संतुलित करतं. इलेक्ट्रोलाइट्समुळेच शरीरातील नसा सक्रिय राहतात. जेव्हा नसांमध्ये इलेक्ट्रोलाइट्स नसतात, तेव्हा त्या योग्य पद्धतीने काम करू शकत नाही. त्यामुळे हृदयापर्यंत योग्य तो संदेश पोहचू शकत नाही, त्यामुळे हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊ शकतात.
advertisement
स्नायूंमध्ये पेटके येणे : जर शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असेल तर स्नायूंमध्ये पेटके येऊ लागतात. मॅग्नेशियम शरीरातील पोटॅशियम आणि कॅल्शियम संतुलित करते. या पोटॅशियम आणि कॅल्शियममुळे स्नायूंच्या पेशींमध्ये एकत्र राहायला मदत होते. ज्यामुळे स्नायू एकजूट राहतात परंतु जेव्हा मॅग्नेशियमची कमतरता असते तेव्हा स्नायू तुटू लागतात ज्यामुळे पायांमध्ये पेटके येतात.
सततचा थकवा : कमी श्रमाचं काम करूनही तुम्हाला फार जास्त थकल्यासारखं वाटत असेल तर समजून जा की, तुमच्या शरीरात उर्जेचा अभाव आहे. थकवा आणि अशक्तपणामुळे पायात पेटके येतात. त्यामुळे तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल किंवा पायात पेटके येत असतील तर हे मॅग्नेशियमच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं.
नैराश्य : जर शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असेल तर मूड कधीही चांगला राहात नाही. मॅग्नेशियममुळे सेरोटोनिन हार्मोनचं प्रमाण वाढतं. जे स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोल नियंत्रित करतं. त्यामुळे आपसूकच सेरोटोनिनचं प्रमाण वाढल्यानंतर कॉर्टिसॉल नियंत्रित व्हायला मदत होते. सेरोटोनिनमुळे मूड चांगला राहतो. जर मॅग्नेशियमची कमतरता असेल तर सेरोटोनिनच्या ऐवजी कॉर्टिसॉचं प्रमाण वाढतं पर्यायाने नैराश्यही वाढतं.
अशी भरून काढा मॅग्नेशियमची कमतरता.
मॅग्नेशियमची कमतरता दूर करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाणं फायद्याचं ठरतं. पालक भाजीत भरपूर मॅग्नेशियम असतं. यासोबतच काजू, बदाम, सूर्यफुलाच्या बिया आणि विविध प्रकारच्या बिया खाल्ल्यानेही मॅग्नेशियमची कमतरता भरून काढता येते. जर तुम्हाला काही गंभीर आरोग्यविषयक समस्या असतील किंवा तुमची औषधं सुरू असतील तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.