कर्करोग हा एक गंभीर आजार आहे, पण काही खबरदारी घेतली तर कर्करोग रोखणं शक्य आहे. सात नोव्हेंबर हा दिवस साजरा करण्याचा उद्देश या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणं आहे. जाणून घेऊयात काही महत्त्वाची माहिती.
Flax Seeds : पंधरा दिवस खा भाजलेले जवस, तब्येतीसाठी आहे खूपच फायदेशीर
आहाराकडे लक्ष द्या - डॉक्टरांच्या मते, कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी तुमच्या दैनंदिन जीवनात सुज्ञ निर्णय घेणं आवश्यक आहे. कर्करोग रोखण्यासाठी संतुलित आहार घ्या. धान्य, भाज्या, फळं आणि शेंगायुक्त आहार यासाठी महत्त्वाचा आहे. लाल आणि प्रक्रिया केलेलं मांस, साखर घातलेली पेयं आणि जास्त प्रक्रिया केलेलं किंवा जास्त चरबीयुक्त पदार्थ मर्यादित केल्यानं धोका आणखी कमी होतो.
advertisement
भाज्या-फळं खा - दररोज कमीत कमी पाच वेळा फळं आणि भाज्यांचा समावेश करा. बीन्स, डाळी, ओट्स आणि ब्राऊन राईससारखे फायबरयुक्त पदार्थ निवडा. सॅच्युरेटेड फॅट्सऐवजी, ऑलिव्ह ऑइल, नट आणि बिया यांसारखे निरोगी फॅट्सचा समावेश करा.
Hair Care: केसांच्या वाढीसाठी अंतर्गत पोषण महत्त्वाचं, हेअर केअर टिप्स नक्की वाचा
नियमित शारीरिक व्यायाम - नियमित शारीरिक व्यायामामुळे स्तन, आतडी आणि मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. म्हणून आठवड्यातून दीडशे मिनिटं मध्यम व्यायाम किंवा पंचाहत्तर मिनिटं जोरदार व्यायाम करण्याचं ध्येय ठेवा. कामाच्या दरम्यान जास्त वेळ बसणं टाळा.
मद्यपान आणि धूम्रपान टाळा - तंबाखू टाळा, मद्यपान मर्यादित करा किंवा पूर्णपणे सोडून द्या. तंबाखू हे जगातील कर्करोगाचं प्रमुख कारण आहे. धूम्रपान सोडल्यानं कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. अगदी कमी प्रमाणातल्या अल्कोहोलमुळेही स्तन, यकृत आणि आतड्यांसारख्या कर्करोगाचा धोका वाढतो. म्हणून, ते टाळणं चांगलं.
या गोष्टी लक्षात ठेवा -
- जास्त एसपीएफ असलेलं सनस्क्रीन आणि संरक्षक कपडे वापरून त्वचेचं अतिनील किरणांपासून संरक्षण करा.
- एचपीव्ही आणि हिपॅटायटीस बी सारख्या लसी वेळेत घेत जा.
- उच्च-जोखीम असलेल्या कर्करोगांसाठी तपासणी करा, जेणेकरून त्यांना लवकर ओळखता येईल आणि उपचार सुधारण्यास मदत होईल.
