TRENDING:

Brain Fog : ब्रेन फॉगवर उपचार शक्य आहेत का ? जाणून घ्या लक्षणं, कारणं, उपचारपद्धती

Last Updated:

जेवणानंतर कधी अचानक झोप येणं, जडपणा येणं किंवा लक्ष केंद्रित करणं अशक्य झाल्यासारखे वाटलंय का? या स्थितीला अनेकदा "ब्रेन फॉग" असं म्हणतात. ब्रेन फॉग म्हणजे एकाग्रतेचा अभाव आणि थकवा येणं. बऱ्याच जणांना हे सामान्य वाटतं, परंतु बहुतेकदा ते आहार आणि जीवनशैलीच्या घटकांमुळे होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

जेवणानंतर कधी अचानक झोप येणं, जडपणा येणं किंवा लक्ष केंद्रित करणं अशक्य झाल्यासारखे वाटलंय का? या स्थितीला अनेकदा "ब्रेन फॉग" असं म्हणतात. ब्रेन फॉग म्हणजे एकाग्रतेचा अभाव आणि थकवा येणं. बऱ्याच जणांना हे सामान्य वाटतं, परंतु बहुतेकदा ते आहार आणि जीवनशैलीच्या घटकांमुळे होते.

तुम्हालाही दुपारच्या जेवणानंतर या समस्येचा त्रास होत असेल, तर ते समजून घेणं आणि वेळेवर उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे.

advertisement

डॉ. काशिका जैन यांनी याविषयी माहिती दिली आहे. दुपारच्या जेवणानंतर ब्रेन फॉग येणं हे शारीरिक थकव्यामुळे नसून ते आहार आणि जीवनशैलीच्या सवयींमुळे होतं. हलकं आणि संतुलित जेवण खाल्ल्यानं, पुरेसं पाणी पिऊन आणि पुरेशी झोप घेतल्यानं मेंदू दिवसभर सक्रिय आणि लक्ष केंद्रित राहू शकतो.

Radish : साधी आणि उपयुक्त भाजी, मुळा का आहे सुपरफूड ? शरीराच्या अनेक समस्या होतील दूर

advertisement

दुपारच्या जेवणानंतर ब्रेन फॉग का येतो ?

दुपारी तेलकट, मसालेदार किंवा जड जेवण केल्यानं शरीराला पचनासाठी जास्त ऊर्जा लागते. यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो आणि थकवा येतो. दुपारच्या जेवणात साखरेचे किंवा जास्त कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाल्ल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं आणि नंतर ते वेगानं कमी होऊ शकतं. या चढउतारांमुळे मेंदू थकू शकतो.

advertisement

डिहायड्रेशनमुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता देखील कमी होते आणि ब्रेन फॉग तयार होतो. रात्रीची चांगली झोप लागली नसेल, तर जेवणानंतर शरीर आणि मन दोन्ही जड वाटू शकतं.

ब्रेन फॉगची लक्षणं -

अचानक थकवा आणि आळस जाणवणं

लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं

कामात वारंवार येणारे अडथळे

डोकं जड होणं

आळस आणि चिडचिडेपणा वाढणं

advertisement

Saffron : केशराची जादू, केशराच्या पाण्याच्या वापरानं सुधारेल त्वचेचा पोत, केशराच्या योग्य वापरासाठी या टिप्स वापरा

ब्रेन फॉग टाळण्याचे सोपे मार्ग -

जेवणात भाज्या, डाळी, संपूर्ण धान्य आणि सॅलडचा समावेश करा. तेलकट आणि तळलेले पदार्थ मर्यादित ठेवा.

जेवणात साखरयुक्त पेयं, गोड पदार्थ किंवा जास्त पांढरा भात खाणं टाळा. त्याऐवजी, दही, ताक किंवा हंगामी फळं निवडा. जेवणापूर्वी आणि नंतर भरपूर पाणी प्या. यामुळे डिहायड्रेशन टाळण्यास आणि मन सक्रिय राहण्यास मदत होईल.

जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी, पाच मिनिटं थोडं फिरा. यामुळे पचन सुधारेल आणि  मन फ्रेश होईल.

दररोज रात्री किमान आठ तास झोप घ्या. पुरेशी झोप असेल तर दिवसा झोपेची समस्या जाणवत नाही आणि  ब्रेन फॉग कमी करता येतो.

कामाच्या दरम्यान लहान ब्रेक घ्या, खोल श्वास घेण्याचा आणि हलके स्ट्रेचेस द्या, यामुळे मेंदूला ऑक्सिजन मिळेल आणि ऊर्जा टिकून राहील.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Brain Fog : ब्रेन फॉगवर उपचार शक्य आहेत का ? जाणून घ्या लक्षणं, कारणं, उपचारपद्धती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल