Radish : साधी आणि उपयुक्त भाजी, मुळा का आहे सुपरफूड ? शरीराच्या अनेक समस्या होतील दूर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
मुळा सगळ्यांनाच आवडेल असं नाही. पण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे वाचलेत तर मुळा न खाणारेही नक्की मुळा खातील. मुळ्यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे गुणधर्म असतात. शरीराला यामुळे अनेक फायदे मिळतात. पाहूयात, मुळा खाण्याचे फायदे आणि त्यांचा आहारात कसा समावेश करावा.
मुंबई : तुमच्या जेवणात मुळा असतो ? काही जण कच्चा मुळा खातात, काहीजण मुळ्याची भाजी, पाल्याची भाजी, मुळ्याचे पराठे खातात.
मुळा ही गरिबांची भाजी म्हणून ओळखली जाते. मुळ्याचा गरम पराठा किंवा खमंग चविष्ट भाजी छान लागते. पण मुळा सगळ्यांनाच आवडेल असं नाही. पण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे वाचलेत तर मुळा न खाणारेही नक्की मुळा खातील.
मुळ्यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे गुणधर्म असतात. शरीराला यामुळे अनेक फायदे मिळतात. पाहूयात, मुळा खाण्याचे फायदे आणि त्यांचा आहारात कसा समावेश करावा.
advertisement
मुळ्याचे आरोग्यदायी फायदे -
आतडी: मुळ्यात भरपूर फायबर असतं. आतड्यांच्या आरोग्यासाठी मुळा अत्यंत फायदेशीर मानला जातो. मुळ्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. पोटाच्या समस्या असतील आणि त्यापासून मुक्ती मिळवायची असेल, तर आहारात मुळा नक्की खा.
यकृत: मुळ्यांमधे आढळणारे काही घटक शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करू शकतात.
advertisement
यकृत आणि मूत्रपिंडं विषमुक्त करण्यास मदत करू शकतात. मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्या असलेल्यांसाठी मुळा खाणं फायदेशीर ठरू शकतं.
वजन: मुळा ही कमी कॅलरी असलेली भाजी आहे. त्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं. यामुळे चयापचय वाढतो आणि चरबी जाळण्यास मदत होते. वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर मुळा खाणं हा एक उत्तम पर्याय असू शकतो.
advertisement
रोगप्रतिकारक शक्ती: मुळ्यात आढळणारं व्हिटॅमिन सी, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करू शकतं आणि सर्दी आणि खोकला यासारख्या बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या समस्या दूर ठेवण्यास मदत करू शकतं. कमकुवत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी मुळा खाणं फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
हृदय: मुळ्यात पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं, यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. आहारात मुळा समाविष्ट केल्यानं हृदयरोगाचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करता येतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2025 8:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Radish : साधी आणि उपयुक्त भाजी, मुळा का आहे सुपरफूड ? शरीराच्या अनेक समस्या होतील दूर