TRENDING:

दिवाळी साजरी करताय? स्वतःची सेफ्टी महत्त्वाचीय, 'या' गोष्टींची घ्या काळजी; नाहीतर घडेल अनर्थ!

Last Updated:

दिवाळीचा सण म्हणजे उत्साह, रोषणाई आणि आपुलकी. घरोघरी दिव्यांची माळ लागते, घराची सजावट होते आणि यासोबतच महिलाही स्वतःला सजवण्यासाठी पूर्ण...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिवाळीचा सण म्हणजे उत्साह, रोषणाई आणि आपुलकी. घरोघरी दिव्यांची माळ लागते, घराची सजावट होते आणि यासोबतच महिलाही स्वतःला सजवण्यासाठी पूर्ण लक्ष देतात. नवीन कपडे, दागिने, आकर्षक हेअरस्टाईल आणि मेकअप करण्याची लगबग सुरू असते. पण दिवाळी हा फक्त दिव्यांचा आणि फटाक्यांचा सण नसून, सुरक्षिततेशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुमचा सण पूर्णपणे सुरक्षित राहील आणि कोणत्याही वाईट अनुभवातून जावे लागणार नाही.
Diwali Safety
Diwali Safety
advertisement

या दिवाळीत तुम्ही सुंदर दिसतानाच 'या' सुरक्षा नियमांचे नक्की पालन करा

१. मोठे आणि लांब कपडे टाळा: आजकाल फोटो क्लिक करण्याचा जमाना आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक आणि लांबसडक ड्रेसेस घालण्याचा ट्रेंड आहे. परंतु कोणताही ड्रेस निवडताना तो सांभाळण्याची काळजी घ्या. विशेषतः दिवाळीच्या काळात, जेव्हा आपण दिवे लावतो किंवा फटाके पेटवतो, तेव्हा लांब कपड्यांमुळे आग लागण्याचा धोका असतो. कपडे व्यवस्थित सांभाळले तर तुमचा मौल्यवान ड्रेस ठिणगी किंवा आगीमुळे जळण्याच्या डागांपासून वाचेल.

advertisement

२. सुती आणि सिल्कसारखे कपडे घाला: फॅब्रिक निवडताना विशेष लक्ष द्या. कॉटन (सुती) आणि सिल्कसारखे फॅब्रिक सहसा आग पकडतात, पण ते त्वचेला चिकटत नाहीत. त्यामुळे आग लागल्यास तुमच्या त्वचेला सहजपणे भाजत नाही. याउलट, जे कपडे जळून त्वचेला चिकटतात, ते धोकादायक असतात. म्हणूनच नायलॉन (Nylon) आणि सिंथेटिक (Synthetic) सारखे फॅब्रिक घालणे पूर्णपणे टाळा. लहान मुलांना दिवाळीसाठी तयार करताना तर कपड्यांच्या फॅब्रिकची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

advertisement

३. केसांना बांधून हेअरस्टाईल करा: दिवाळीच्या वेळी मोकळ्या केसांची हेअरस्टाईल करणे टाळणे हा एक उत्तम पर्याय आहे. कारण मोकळे केस दिव्याची ज्योत किंवा फटाक्यांची ठिणगी सहज पकडू शकतात, ज्यामुळे जळण्याचा धोका वाढतो. त्यामुळे आकर्षक वाटेल अशी, पण सुरक्षित हेअरस्टाईल म्हणून केसांना बांधून अंबाडा किंवा वेणी घालणे सोयीचे ठरते.

४. केसांवर हेअर स्प्रे लावू नका: जर तुम्ही हेअरस्टाईल करत असाल, तर हेअर स्प्रेचा वापर शक्यतो टाळा. विशेषतः मोकळ्या केसांमध्ये स्प्रे करू नका. कारण या स्प्रेमध्ये असलेले हानिकारक रसायन (chemical) लवकर आग पकडण्याचा धोका असतो. या सोप्या आणि महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमची दिवाळी आनंदी, सुंदर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'सुरक्षित' करू शकता!

advertisement

हे ही वाचा : तुमच्यातही दिसताहेत 'ही' ७ लक्षणे? तर समजून जा 'मेंटल प्राॅब्लेम' आहे; लगेच भेटा डाॅक्टरांना, अन्यथा...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनला भाव वाढ नाहीच, कांदा अन् मक्याला काय मिळाला आज दर? Video
सर्व पहा

हे ही वाचा : काय सांगता! फक्त 12,000 रुपयांमध्ये भारतीय आइसलँडमध्ये होऊ शकतात कायमस्वरूपी शिफ्ट, काय आहे प्रोसेस?

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
दिवाळी साजरी करताय? स्वतःची सेफ्टी महत्त्वाचीय, 'या' गोष्टींची घ्या काळजी; नाहीतर घडेल अनर्थ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल