एकच शाळा, एकच बाक आणि आता एकत्र व्यवसाय; सख्ख्या मैत्रिणी फूड ट्रकमधून कमावतायत लाखोंचं उत्पन्न
लहान मुलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण का वाढले याचे काय करणे काय? लक्षणे काय? आणि उपाय काय करावे..!
खानपानातील बदलामुळे लहान मुलांमध्ये पौष्टिक पदार्थच आहारात मिळत नाहीत. केवळ जंकफूड, मसालेदार पदार्थ याशिवाय तळलेल्या पदार्थाचा भडिमार केला जात आहे. यातून आरोग्याचे चक्र प्रभावित झाले आहे. परिणामी लहान मुलांमध्ये हृदयविकाराच्या घटना वाढत आहे. याबरोबरच गोड पदार्थांचे सेवन वाढले आहे यामुळे तयार झालेल्या ऊर्जेचा वापर होत नाही. ही ऊर्जा थेट चरबीमध्ये रूपांतरीत होत आहे. यातून लठ्ठपणा वाढला जातो आणि हे धोकादायक ठरू शकते. मुलांमध्ये खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा स्क्रिन टाइम वाढला आहे. मुले सारखी मोबाइल किंवा टीव्ही बघत असतात. यामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. बाहेरचे पदार्थ खाणे, मोबाइल पाहणे यातून मुलांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
advertisement
लक्षणे कोणती आहेत..?
मुलांमध्ये वजन वाढत असल्याचे निदर्शनास येताच तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. यामुळे त्यात वेळेपूर्वीच उपाययोजना करता येतात. होणारा त्रास टाळता येऊ शकतो. पालकांनी आपल्या पाल्ल्यांना जंकफूड पदार्थ देऊ नये. आरोग्य चांगले राहण्यासाठी घरचे पदार्थ देत राहावे.
घरीच बनवा हेल्दी आणि चविष्ठ दुधी भोपळ्याचे कोपटे
उपाय काय..!
मुलांना दररोज किमान एक तास खेळण्यासाठी द्यावा, मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी जाऊ देऊ नये. मुलांना खेळण्यासाठी भरपूर वेळ द्यावा. जेणेकरून शरीराची हालचाल होईल आणि मुले तंदुरुस्त राहतील. याबरोबरच मुलांच्या दैनंदिन जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे. मुलांना धावणे, सायकल चालवणे, पोहणे, मैदानी खेळ यात सहभागी करून शरीराची हालचाल होईल याची काळजी घ्यावी. तसेच संतुलित व पौष्टिक आहार हा हृदयाच्या आरोग्यासाठी महत्वाचा घटक आहे. जंक फूड, तेलकट आणि गोड पदार्थांपासून दूर ठेवून फळे, भाज्या, दूध, कडधान्ये व सुकामेवा यांच्या सेवनाला प्राधान्य द्यावे. मुलांना पुरेशी झोप मिळाली पाहिजे कारण अपुरी झोप हृदयावर ताण आणू शकते. त्याचबरोबर शालेय अभ्यासाचा ताण, स्पर्धात्मक दबाव यामुळे मानसिक आरोग्य बिघडून हृदयावर परिणाम होऊ शकतो, म्हणून मुलांना संगीत, चित्रकला, वाचन, खेळ यासारख्या छंदांमध्ये व्यस्त ठेवून आनंदी व ताणमुक्त वातावरण देणे महत्त्वाचे आहे. याशिवाय वजन, रक्तदाब व हृदयाची तपासणी वेळोवेळी करून घ्यावी, विशेषतः घरात वारसा म्हणून हृदयविकाराचे प्रमाण असल्यास डॉक्टरांचा नियमित सल्ला घ्यावा.