दुधी भोळ्याचा असा प्रकार यापूर्वी कधी खाल्लाय का? लहान मुले देखील करतील 5 मिनिटात फस्त

Last Updated:

कारगील युद्धात आपल्या अर्ध्या शरीराची आहुती देणारे नायक दीपचंद हे फक्त शूर सैनिक नाही तर एक चांगले आचारी सुद्धा आहे. दीपचंद हे नेहमी आपल्या पाकघरात नवीन नवीन पदार्थ बनवत असतात आणि इतराना सांगत असतात त्याच पद्धतीने आता दुधी भोपड्याचं कोपते कसे बनवतात हे त्यांनी सांगितले आहे.चला तर मग आज आपण एका शूर सैनिकाकडून पाककला शिकूया.

+
दुधी

दुधी भोपळ्याचे कोपते

कारगील युद्धात आपल्या अर्ध्या शरीराची आहुती देणारे नायक दीपचंद हे फक्त शूर सैनिक नाही तर एक चांगले आचारी सुद्धा आहे. दीपचंद हे नेहमी आपल्या पाकघरात नवीन नवीन पदार्थ बनवत असतात आणि इतराना सांगत असतात त्याच पद्धतीने आता दुधी भोपड्याचं कोपते कसे बनवतात हे त्यांनी सांगितले आहे. चला तर मग आज आपण एका शूर सैनिकाकडून पाककला शिकूया.
साहित्य
एक दुधी भोपळा, कांदा, टॉमेटो, मिरची, अद्रक लसूण पेस्ट, हळद, तिखट, मीठ, धान्याची पूड, गरम मसला, हिंग, ओवा, बेसन पीठ आणि दही. 
advertisement
कृती  
  • सर्वात पहिले आपल्याला हवा तसा दुधी भोपळा घेणे.त्यानंतर त्याला स्वच्छ धुतल्या नंतर त्याचा बारीक किस करून घेणे आणि नंतर पुन्हा त्याला भिजऊन एक स्वच्छ कापडात बांधून त्याचे सर्व पाणी काढून घेणे.किमान 5 मिनिटे कापड  घट्ट बांधून त्याला बाजूला ठेवणे.
  • या नंतर बांधलेला कपडाला उघडून भोपळ्याला मोकळ करने हे करत असताना बाजूला कढईत तेल गरम केल्यानंतर  भोपळ्याला किस मध्ये मीठ अद्रक लसणाची पेस्ट घालून त्यात एक किवा दोन चमचे बेसन घालणे.त्या नंतर याना एक जीव करून घेणे आणि यांचे छोटे गोळे बनविणे.  या नंतर हे सर्व बनवलेले गोळे तेलात लाल होण्यापर्यत तळून घेणे.  एका बाजूला पुन्हा एका गढईत थोडे भाजी बनविण्यासाठी तेल घेणे.
  • या नंतर तेल गरम झाल्यावर यात जिरे मोहरी टाकणे  आणि नंतर अद्रक लसणाचा पेस्ट टाकून परतून घेणे. त्याच वेळी यात कांदा लाल होई पर्यंत परतात राहावे. या नंतर यात दही टाकणे त्या नंतर टोमॅटो टाकून ठोला वेळ शिजऊन घेणे. यात सर्व मसाले घालून ठोला टाइम पुन्हा याला गॅस वाढून 5 मिनिट शिजून घेणे.दही घातल्याने भाजीला चांगले पाणी सुटले. या नंतर यात बनवलेले दुधी भोपळ्याचे कोपते टाकून थोडा टाइम कढई वर झाकण ठेऊन 3 ते 4 मिनिटी वाफेवर होऊ देणे. यानंतर ही भाजी खाण्यासाठी तयार राहणार आहे.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
दुधी भोळ्याचा असा प्रकार यापूर्वी कधी खाल्लाय का? लहान मुले देखील करतील 5 मिनिटात फस्त
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement