TRENDING:

चिमुकल्याने बदाम गिळलं, करावी लागली सर्जरी; मुलांच्या घशात काही अडकल्यावर लगेच काय करायचं? डॉक्टरांचा VIDEO

Last Updated:

What To Do After Child Food Choked : तुमच्या मुलासोबत असा प्रकार घडला तर काय करायला हवं ते डॉक्टरांनी व्हिडीओतून सांगितलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात डॉक्टरांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका एक वर्षीय चिमुकल्याने बदामाचा तुकडा गिळला, यामुळे त्याचा जीव धोक्यात होता. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून या मुलाचा जीव वाचवला आहे. पण मुलांनी असं काही गिळलं की पालकांनी लगेच काय करायला हवं, हे त्यांना माहिती असायला हवं. याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
News18
News18
advertisement

लहान मुलं म्हटली की खेळता खेळता काहीही तोंडात घालणं, अशी कितीतरी प्रकरणं आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील प्रकरणात तर एक वर्षाच्या मुलाने बदामाचा तुकडा गिळला होता आणि त्याच्या पालकांना माहिती नव्हती. त्याला खोकला, ताप येत होता, त्याचा श्वास गुदमरू लागाल. तब्बल सात दिवसांपासून त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेलं. तिथं तपासणीत त्याच्या डाव्या फुफ्फुसात बदामाचा तुकडा अडकल्याचं समजलं.

advertisement

Shocking! वयाच्या 24 व्या वर्षी आली दाढी आणि तरुणाचा झाला मृत्यू, नेमकं घडलं काय?

या मुलावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. दुर्बिणीद्वारे (ब्रोन्कोस्कोपी) विशेष चिमट्याच्या सहाय्याने फुफ्फुसात अडकलेला बदामाचा तुकडा यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे बालकाचा जीव वाचला.

मुलांच्या घशात काही अडकलं की पालकांनी काय करायचं?

पण तुमच्या मुलासोबत असा प्रकार घडला तर काय करायला हवं ते डॉक्टरांनी व्हिडीओतून सांगितलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात डॉक्टरांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं आहे.

advertisement

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार मुलाच्या हनुवटीला सपोर्ट द्या आणि त्याच्या पाठीवर हाताने पाच वेळा मारा. यानंतर मूल रडायला लागलं किंवा त्याच्या तोंडातून काही बाहेर येत असेल तर काही करायची गरज नाही. पण तरी मुलाने जे काही गिळलं आहे ते बाहेर आलं नाही तर हीच पद्धत 3 वेळा रिपीट करू शकता.

Tomato : टोमॅटोचा हलवा, विचित्र वाटेल पण अनेकांनी ट्राय केलाय, हा घ्या Recipe Video

advertisement

या पद्धतीने जर मुलाने गिळलेलं बाहेर आलं नाही तर त्याला पाठीला सपोर्ट द्या आणि छातीच्या मधोमध 4 बोटांनी 3 वेळा दाब द्या. याचाही काही परिणाम झाला नाही तर मात्र तुम्ही डॉक्टरांकडे जा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रेडी-टू-कुक ब्रँड, चविष्ट पदार्थ मिळतील फक्त 85 रुपयांपासून, ठाण्यात हे लोकेशन
सर्व पहा

बालरोगतज्ज्ञ डॉ.मयुर कलसरिया यांनी त्यांच्या @pediatrics_decoded या युट्युब चॅनेलवर ही माहिती दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
चिमुकल्याने बदाम गिळलं, करावी लागली सर्जरी; मुलांच्या घशात काही अडकल्यावर लगेच काय करायचं? डॉक्टरांचा VIDEO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल