TRENDING:

रेडी-टू-कुक ब्रँड, चविष्ट पदार्थ मिळतील फक्त 85 रुपयांपासून, ठाण्यात हे लोकेशन

Last Updated:

फक्त गरम पाणी टाकून काही मिनिटांत तयार होणारे हे पदार्थ गृहिणी, नोकरदार वर्ग तसेच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : आजच्या वेगवान आणि धावपळीच्या जीवनशैलीत घरगुती स्वयंपाकासाठी पुरेसा वेळ देणे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. अशा परिस्थितीत ठाण्यातील स्थानिक ब्रँड धनश्री गृहउद्योग त्यांच्या चविष्ट आणि सोयीस्कर रेडी-टू-कुक पदार्थांमुळे सध्या विशेष चर्चेत आले आहेत. फक्त गरम पाणी टाकून काही मिनिटांत तयार होणारे हे पदार्थ गृहिणी, नोकरदार वर्ग तसेच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.
advertisement

धनश्री गृहउद्योगाकडून पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचे विविध पदार्थ रेडी-टू-कुक स्वरूपात उपलब्ध करून दिले जात आहेत. यामध्ये प्रसाद शिरा (85 रुपये), कोथिंबीर वडी (90 रुपये), अळूवडी (90 रुपये), डाळ खिचडी, ढोकळा (90 रुपये), मेदू वडा (95 रुपये), मसाले भात, कांदे पोहे (49 रुपये), वेज कोल्हापुरी (79 रुपये) तसेच विविध भाज्यांच्या ग्रेव्हींचा समावेश आहे. हे पदार्थ कमी वेळात तयार होतात आणि घरगुती चव टिकवून ठेवतात अशी ग्राहकांची प्रतिक्रिया आहे.

advertisement

या उत्पादनांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व पदार्थ कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह न वापरता तयार केले जातात. त्यामुळे आरोग्याबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांमध्ये या ब्रँडला मोठी पसंती मिळत आहे. चव, दर्जा आणि सोयीस्करपणा यांचा उत्तम मेळ साधत धनश्री गृहउद्योगाने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

घरातील सर्वच खातील आवडीने, बनवा चवदार सोयाबीन पकोडे, रेसिपीचा संपूर्ण Video

advertisement

विशेष बाब म्हणजे धनश्री गृहउद्योग केवळ ग्राहकांसाठीच नव्हे तर स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांसाठीही एक संधी उपलब्ध करून देत आहे. इच्छुक व्यक्तींना हे सर्व रेडी-टू-कुक पदार्थ होलसेल दरात दिले जात असून त्यामुळे कमी भांडवलात स्वतःचा खाद्य व्यवसाय सुरू करता येत आहे. यामुळे अनेक महिला आणि तरुणांना स्वयंरोजगाराची संधी मिळत असल्याचे दिसून येत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक ते ट्रेंडी वस्तू, ठाण्यात स्वस्तात करा खरेदी, इथं भरलंय खास प्रदर्शन
सर्व पहा

धनश्री गृहउद्योगाचे हे सर्व पदार्थ ग्राहकांना ऑनलाइन स्वरूपातही उपलब्ध असून www.dhanashreefood.com या वेबसाइटवरून सहजपणे ऑर्डर करता येतात. स्थानिक उद्योगाला प्रोत्साहन देत पारंपरिक चवीचा आधुनिक पर्याय देणारा धनश्री गृहउद्योग भविष्यात उत्पादनांची श्रेणी वाढवण्याच्या तयारीत असल्याचेही सांगितले जात आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
रेडी-टू-कुक ब्रँड, चविष्ट पदार्थ मिळतील फक्त 85 रुपयांपासून, ठाण्यात हे लोकेशन
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल