TRENDING:

Kitchen Hacks : चणे भिजवले नाहीत, पण छोले-पुरी खायची इच्छा होतेय? न भिजवता या पद्धतीनं होतील मऊ!

Last Updated:

How to cook chickpeas without soaking : एखादेवेळी चणे भिजवलेले नसताना आपल्याला त्याची भाजी खावीशी वाटली तर? यावर एक उत्तम उपाय आहे. चला पाहूया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : छोले किंवा चण्याची भाजी आपल्याकडे पुरीसोबत बनवली जाते. बरेच लोक जे गोड खात नाहीत, ते पाडव्यालादेखील पुरीसोबत छोल्यांचा बेत करतात. जेव्हा माहित असतं भाजी करायची आहे, तेव्हा चणे साहजिकच भिजवले जातात. पण एखादेवेळी चणे भिजवलेले नसताना आपल्याला त्याची भाजी खावीशी वाटली तर? यावर एक उत्तम उपाय आहे. चला पाहूया.
चणे न भिजवता मऊ बनवण्यासाठी वापरा या युक्त्या..
चणे न भिजवता मऊ बनवण्यासाठी वापरा या युक्त्या..
advertisement

चण्याची भाजी कारण्यासतजी चणे रात्रभर किंवा 7 ते 8 तास भिजवावे लागतात. तरच ते मऊ होतात आणि लवकर शिजतात. पण चुकून तुम्ही चणे भिजवायला विसरलात तर काळजी करू नका. काही सोप्या युक्त्या वापरून तुम्ही चणे न भिजवताही मऊ बनवू शकता. गृहिणी पूनम यांनी चणे मऊ बनवण्यासाठी काही युक्त्या सांगितल्या आहेत.

advertisement

चणे न भिजवता मऊ बनवण्यासाठी वापरा या युक्त्या..

- चणे न भिजवता भाजी बनवायची असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे गरम पाण्याचा वापर. सर्वात आधी चणे स्वच्छ धुवा आणि नंतर ते एका भांड्यात घालून त्यावर उकळते गरम पाणी ओता. भांडे झाकून ठेवा 20 ते 30 मिनिटे तसेच राहू द्या. या वेळेत चणे गरम पाणी शोषतील आणि थोडे मऊ होतील, ज्यामुळे ते शिजवायला सोपे जातील.

advertisement

- चणे लवकर मऊ करण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करणे देखील खूप उपयुक्त ठरते. चणे गरम पाण्यात थोडा वेळ भिजवल्यानंतर ते कुकरमध्ये टाका. यामध्ये पाणी टाकून त्यात चिमूटभर मीठ किंवा थोडे तेल घाला. कुकरला 6 ते 7 शिट्ट्या होऊ द्या. यामुळे चणे लवकर शिजतील.

- तुम्हाला हॉटेलात मिळते तसा चण्यांना गडद हवा असेल तर चणे कुकरमध्ये उकळताना त्यात चहापत्ती कापडात बांधून टाका. यामुळे चण्याचा रंग अधिक गडद होईल आणि ते आकर्षक दिसतील. ही युक्ती अनेक शेफ वापरतात आणि यामुळे चण्यांना थोडी छान चव येते.

advertisement

- चणे लवकर मऊ करण्यासाठी चिमूटभर बेकिंग सोडादेखील वापरला जाऊ शकतो. मात्र त्याचा अतिवापर करू नका. कारण त्यामुळे चव आणि पोषण कमी होऊ शकतं. म्हणून याचा वापर मर्यादित स्वरूपातच करा.

- शेवटी वाचण्याची भाजी एकदम हॉटेलसारखी चविष्ट बनवण्यासाठी त्यामध्ये योग्य मसाले, आलं, लसूण, टोमॅटो आणि गरम मसाला घाला. भाजी होत आल्यावर त्यामध्ये थोडी कसुरी मेथी किंवा आमचूर पावडर टाका. यांनाही भाजीची चव आणखी वाढते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Hacks : चणे भिजवले नाहीत, पण छोले-पुरी खायची इच्छा होतेय? न भिजवता या पद्धतीनं होतील मऊ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल