TRENDING:

Custard Apple for Diabetes: डायबिटीस आहे तरीही बिनधास्त खा सीताफळ; होतील अनेक फायदे

Last Updated:

Benefits of Custard Apple in Marathi: सीताफळात असे काही गुणधर्म आहे जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. जाणून घेऊया सीताफळाचे फायदे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला डायबिटीस अर्थात मधुमेहाची लागण झाली की, त्या व्यक्तीला फळांपासून फारकत घ्यावी लागते. डायबिटीस असलेल्या व्यक्तीसाठी जांभूळ खाणं फायदेशीर मानलं जातं. मात्र जाभंळं तर फक्त उन्हाळ्यात येतात. मग डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी वर्षातले 8-9 महिने काय खायचं ? त्यातच त्याला एखादं गोड किंवा अतीगोड फळ खायची इच्छा झालीच तर ती इच्छा मारण्याशिवाय किंवा डायबिटीसच्या गोळ्यांचा एक डोस जास्त घेण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, तुम्हाला डायबिटीस जरी असेल तरी तुम्ही  सीताफळ खाऊ शकता तर कदाचीत तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे. सीताफळात असे काही गुणधर्म आहे जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. जाणून घेऊया सीताफळाचे फायदे.
प्रतिकात्मक फोटो : डायबिटीसवर गुणकारी आहे सीताफळ
प्रतिकात्मक फोटो : डायबिटीसवर गुणकारी आहे सीताफळ
advertisement

सीताफळ खाण्याचे फायदे (Custard Apple for Diabetes)

1. कमी कोलेस्ट्रॉल

सीताफळात हेल्दी फॅट्स आढळून येतात जे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांना उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका जास्त असतो त्यामुळे सीताफळ खाणं त्यांच्यासाठी प्रचंड फायद्याचं ठरतं

2. व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स

सीताफळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अँटिऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात आढळून येतात. यामुळे शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी होतात, जे डायहबिटीसच्या रुग्णांमध्ये सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा जास्त असतात. या मुक्त रॅडिकल्समुळे शरीरातील वाईट पेशींचा आणि नाश होतो.

advertisement

3. मॅग्नेशियम आणि पोटॅशियम

डायबिटीच्या रूग्णांना हार्ट ॲटॅकचा धोका जास्त असतो. मात्र सीताफळात असलेली मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी खनिजे असतात, जी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून हृदय व रक्तवाहिन्यांना असलेला धोका  आणि हार्ट ॲटॅकचा धोका कमी होतो.

हेही वाचा:Risk of Nail Paint: सावधान ! तुमची नेलपॉलिश ठरू शकते कॅन्सरचं कारण; देईल हार्ट ॲटॅकला निमंत्रण

advertisement

4. फायबर्स

सिताफळात फळात भरपूर प्रमाणात फायबर असतात जे डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. फायबर्स हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. फायबरमुळे शरीरात साखर सोडली जाते, त्यामुळे गोड जरी खाल्लं तरीही रक्तातली साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

5. वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त

डायबिटीसच्या रूग्णांना वजन नियंत्रित ठेवणं महत्वाचं असतं मात्र त्यांना सतत भूक लागत असल्यामुळे  ते काही ना काही खात राहतात. त्यामुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढण्याची भीती असते. मात्र सीताफळात कमी कॅलरीज आणि जास्त फायबर्स असतात त्यामुळे पोट भरलेलं राहतं. यामुळे वजन नियंत्रणात राहतं.

advertisement

हेही वाचा:Relationship Tips: कधीच करू नका या 3 चुका; उद्ध्वस्त होईल सुखी संसार

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Custard Apple for Diabetes: डायबिटीस आहे तरीही बिनधास्त खा सीताफळ; होतील अनेक फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल