Relationship Tips: कधीच करू नका या 3 चुका; उद्ध्वस्त होईल सुखी संसार

Last Updated:

Relationship tips in Marathi: तुम्हाला तुमचं लग्न टिकवायचं असेल तर तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवावा लागेल. जिथे विश्वासाला तडा जाईल तिथे तुमचं नातं तुटायला सुरूवात झालीच म्हणून समजा. तुम्ही जर या चुका टाळल्यात तर तुमच्या सुखी संसाराला कोणाचीही दृष्ट लागणार नाही.

प्रतिकात्मक फोटो :  कधीच करू नका या 3 चुका ; उद्ध्वस्त होईल सुखी संसार
प्रतिकात्मक फोटो : कधीच करू नका या 3 चुका ; उद्ध्वस्त होईल सुखी संसार
Relationship tips in Marathi: हिंदू संस्कृतीमध्ये लग्नव्यवस्थेला फार महत्व आहे. मात्र सध्या वाढलेलं घटस्फोटांचं प्रमाण पाहिलं की, ही लग्नव्यवस्था, लग्नपद्धती संकटात सापडली आहे का असा प्रश्न पडतो. अनेकदा जे सुखी संसार तुटतात त्यामागे वाद,अपेक्षाभंग, लैंगिक समस्या अशी कारणं असू शकतात. मात्र या ही पेक्षा एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे विश्वास. जर तुम्हाला तुमचं लग्न टिकवायचं असेल तर कोणत्याही स्थितीत तुम्ही आपल्या जोडीदारावर विश्वास हा ठेवायलाच हवा. जिथे या विश्वासाला तडा जाईल तिथे तुमचं नातं तुटायला सुरूवात झालीच म्हणून समजा. याशिवाय इथे ज्या चुका आम्ही सांगतो आहोत, त्या जर तुम्ही टाळल्यात तर तुमच्या सुखी संसाराला कोणाचीही दृष्ट लागणार नाही.
अविश्वास
विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया असतो. पती त्याच्या पत्नीवर किंवा पत्नीला तिच्या पतीवर संशय घेत असेल तर असं नातं फार काळ टिकत नाही आणि टिकलं तरीही त्यात कटुता येते. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं नातं टिकवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जोडीदारावर विश्वास हा दाखवावाच लागेल. काही समस्या असतील तर एकमेकांशी मोकळेपणाने बोला. बऱ्याचदा अनावश्यक अविश्वासामुळे नातेसंबंधांमध्ये आणखी दरी निर्माण होते.
advertisement
सुसंवाद
जर तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये सुसंवादाचे नसेल तर तुमचं नातं टिकणं कठीण आहे. कारण जर तुम्ही एकमेकांशी नीट बोलत नसाल, एकमेकांशी संवाद साधत नसाल तर तुम्हाला एकमेकांची सुखं-दुखं कळणार नाहीत. तुम्ही एकमेकांपासून दुरावू शकता. तुमच्या आयुष्यात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होईल जो तुमच्या नात्यासाठी घातक ठरू शकतो.
advertisement
तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप
एखाद्या दाम्पत्याचं भांडण झालं की त्यांची समजूत काढण्यासाठी म्हणा किंवा आणखी कोणत्या उद्देशाने तिसरी व्यक्ती अनेकदा प्रत्येक नात्यात हस्तक्षेप करते. परंतु या हस्तक्षेपाचा वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हस्तक्षेप करणारी व्यक्ती तुमचा मित्र, मैत्रिण, आई-वडिल किंवा अगदी तुमचा मुलगा किंवा मुलगी जरी असली तरीही त्यांच्या हस्तक्षेपाचा परिणाम हा तुमच्या नात्यावर होऊ शकतो. याचं कारण अगदी साधं आणि सोपं आहे. हस्तक्षेप करण्याऱ्या व्यक्तीने कोणाची एकाची बाजू जरी घेतली तरीही समोरची व्यक्ती नाराज होऊ शकते आणि त्यांनी दोघांच्या बाजूने, जरी सर्वसमावेशक निर्णय दिला तरीही तुम्ही नाराजच राहाल. तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप अनेक चुकीच्या निर्णयांना कारणीभूत ठरू शकतो.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Relationship Tips: कधीच करू नका या 3 चुका; उद्ध्वस्त होईल सुखी संसार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement