दगडाबाई भालेकर असं या आजीबाईंचं नाव आहे. त्या जालना जिल्ह्यातल्या वरुडच्या रहिवाशी आहेत. दगडाबाई यांना एकूण 6 मुली आणि 2 मुलं आहेत. त्यांच्या नातीलाही आता नात झालीय. त्यांनी 6 पिढ्या प्रत्यक्ष पाहिल्यात. 110 वर्षांच्या झाल्यानंतरही त्यांना अजून चश्मा लागलेला नाही. त्याचबरोबर त्यांचे कानही चांगले आहेत. इतकंच नाही तर वयाची सेंच्युरी होईपर्यंत त्यांनी दावाखण्याची पायरीही चढली नव्हती.
advertisement
इराणचे खजूर जालन्यात, शेतकऱ्याने कमावले 8 लाख रुपये, असं केलं नियोजन Video
मी त्याकाळी मोठ्या प्रमाणावर अंग मेहनतीचे कामे केली. रानावनातील भाज्या खाल्या. सकाळी कोंबडा आवरताच उठायचे. जात्यावर पीठ दळायचे, सडा सारवण करायचे. दिवसभर शेतात काम करून रात्री लवकर झोपायचे असा दिनक्रम असल्याचे दगडाबाई सांगतात.
आमच्या आईचं वय 110 वर्षांच्या जळपास आहे. आईचं राहणीमाण आणि आहार हा जुन्या पद्धतीचा आहे. आजही त्या स्वत:ची कामं स्वत: करतात. साधी राहणी आणि योग्य आहार यामुळे त्यांना एवढं आयुष्य लाभलं असं दगडाबाई यांचे पुत्र रंगनाथ भालेकर यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील 'बुलेटचं गाव' माहितीये का? नावामागं आहे खास कारण
'आमच्या सासूबाईंना रानातल्या भाज्या आवडता. त्यांनी सर्व विषमुक्त भाज्या खाल्ल्या आहेत. त्यावेळी कोणतीही विषारी किटकनाशकं नव्हती. त्यांनी यापूर्वी अंगमेहनतीची बरीच कामं केली आहेत. त्यांच्या तंदुरुस्तीचं मला नवल वाटतं, असं दगडाबाई यांच्या सूनबाई सुनिता भालेकर यांनी सांगितलं.





