प्रसिद्ध योग गुरु आणि लेखिका हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत, त्यांनी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत. ज्यामुळे वजन कमी करणं सहज शक्य होऊ शकतं.
Mouth Odour : दात घासल्यावरही तोंडाचा वास येतो ? जाणून घ्या कारणं, उपचारपद्धती
advertisement
प्रत्येक सकाळ म्हणजेच एका अख्ख्या दिवसाची सुरुवात. आपल्या शरीराला चोवीस तास म्हणजे आणखी एक नवीन संधी असते या विचारानं दिवसाची सुरुवात करा.
योग्य सवयींमुळे वजन आपोआप नियंत्रणात येऊ शकतं. लवकर उठणं हे वजन कमी करण्यासाठी पहिलं आणि सर्वात महत्वाचं पाऊल आहे. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी उठल्यानं आपलं शरीर योग्यरित्या कार्य करायला मोठी मदत होते.
सकाळी लवकर उठण्याच्या सवयीमुळे चयापचय सुधारतं, भूक नियंत्रित होते आणि चरबी जाळण्यास गती मिळते. शरीरातील नैसर्गिक संप्रेरक, कॉर्टिसोल, पहाटे चार ते सहादरम्यान सक्रिय असतो. या वेळी उठल्यानं इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि बीएमआय म्हणजेच body mass index कमी होतो. लवकर उठायचं असेल तर त्यासाठी लवकर झोपण्याची सवय लावली पाहिजे.
नैसर्गिक औषध - सकाळचा सूर्यप्रकाश - सकाळी दोन-तीन मिनिटं उन्हात बसा. सकाळचा सूर्यप्रकाश लेप्टिन, घ्रेलिन आणि मेलाटोनिन या संप्रेरकांच्या संतुलनासाठी महत्त्वाचा आहे. लेप्टिनमुळे पोट भरल्याचे संकेत मिळतात, तर घ्रेलिन हा भूकेचा संप्रेरक आहे आणि मेलाटोनिन हा झोपेचा संप्रेरक आहे.
या तीन हार्मोन्सवर नियंत्रण ठेवल्यानं वजन नियंत्रित होऊ शकतं. संप्रेरक नियंत्रित केल्यानं कॅलरीजचं प्रमाण दहा-पंधरा टक्क्यांनी कमी होऊ शकतं असं अनेक अभ्यासांच्या निष्कर्षांवरून दिसून आलं आहे.
Pimples : मुरुम किंवा पुरळ येण्याचं कारण घरातच ? औषधांआधी बदला या सवयी
रोजच्या जेवणाचं नियोजन - दिवसभरात अनियमितपणे खाण्यानं वजन वेगानं वाढतं. म्हणून, दररोज सकाळी काय आणि केव्हा खाणार याचं नियोजन करा. यामुळे कॅलरीजचं प्रमाण कमी होईल आणि वजन नियंत्रणात राहील.
दररोज एकाच वेळी व्यायाम करा - दररोज सकाळी एका निश्चित वेळी व्यायाम करण्याची सवय लावा. यामुळे रक्तातील साखरेचं नियंत्रण, पचन सुधारणं आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान करण्यास मदत होते. दिवसातून केवळ वीस मिनिटं योगा, चालणं किंवा इतर कोणताही हलका व्यायाम करू शकता. वेळेपेक्षा नियमितता जास्त महत्त्वाची आहे.
दररोज सकाळी ही दिनचर्या पाळली तर शरीरात चांगले बदल दिसून येतील. योगगुरूंच्या मते,दररोज सकाळी या चार गोष्टी केल्यानं वजन कमी करणं सहज शक्य होतं.
