TRENDING:

Papaya : आरोग्यासाठीचा चांगला मित्र - पपई, वाचा रोज पपई खाण्याचे फायदे

Last Updated:

पपई हा आरोग्याचा खजिना मानला जातो. दिवसाच्या सुरुवातीला, नाश्त्यात पपई खाणं आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतं. पपईत व्हिटॅमिन सी, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि पपेन सारखे पोषक घटक असतात. या घटकांमुळे, शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. जाणून घेऊया पपई खाण्याचे फायदे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पपई हा आरोग्यासाठीचा चांगला मित्र म्हणायला हवा. पपई हे फळ गोड चवीसाठी आवडतं तसंच या बहुपयोगी फळाचे अनेक आरोग्यवर्धक फायदेही आहेत.
News18
News18
advertisement

पपई हा आरोग्याचा खजिना मानला जातो. दिवसाच्या सुरुवातीला, नाश्त्यात पपई खाणं आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतं. पपईत व्हिटॅमिन सी, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि पपेन सारखे पोषक घटक असतात. या घटकांमुळे, शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. जाणून घेऊया पपई खाण्याचे फायदे.

Open Pores : महागड्या फेशियलच्या आधी हे उपाय करुन पाहा, स्वस्त - झटपट फेसपॅक

advertisement

चांगलं पचन - पपईतलं पपेन एंझाइम पचन चांगलं होण्यासाठी उपयुक्त आहे. गॅस, बद्धकोष्ठता, आम्लता किंवा जडपणा यासारख्या पोटाच्या समस्यांवर पपई हा चांगला आणि नैसर्गिक उपाय आहे.

हृदयासाठी फायदेशीर - पपईतील फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी मदत करतात. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त - वजन लवकर कमी करायचं असेल तर आहारात पपईचा समावेश करा. त्यात कमी कॅलरीज आणि उच्च फायबर असल्यानं पोट जास्त काळ भरलेलं राहू शकतं. यामुळे वारंवार भूक लागण्याचं प्रमाण कमी होतं.

advertisement

त्वचेसाठी फायदेशीर - त्वचेवर नैसर्गिक चमक हवी असेल तर दररोज सकाळी एक पपई खा. त्वचेतील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी पपई उपयुक्त आहे. सुरकुत्या, डाग आणि मुरुमं कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. शिवाय, त्यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म आहेत.

Skinimalism : Skinimalism म्हणजे काय रे भाऊ ? पाहूया स्किनकेअरमधला हटके ट्रेंड

डोळ्यांसाठी फायदेशीर - डोळ्यांच्या समस्या असलेल्यांसाठी पपई वरदान आहे. कारण यात व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतं, दृष्टी सुधारण्यासाठी याची मदत होते. वयाशी संबंधित डोळ्यांच्या समस्या टाळता येतात.

advertisement

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं फळ - पपईत व्हिटॅमिन सी, ए आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. बदलत्या ऋतूंमध्ये आजार रोखण्यासाठी हे फळ अत्यंत फायदेशीर आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात तेजी, कपाशी, तूर आणि सोयाबीनला किती मिळाला शुक्रवारी भाव? Video
सर्व पहा

ऊर्जा - वारंवार थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर नाश्त्यात पपई खाणं हा चांगला पर्याय आहे. पपईमुळे ऊर्जा पातळी चांगली राहते आणि शरीर आतून स्वच्छ करून यकृताचं कार्य सुधारण्यास मदत करते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Papaya : आरोग्यासाठीचा चांगला मित्र - पपई, वाचा रोज पपई खाण्याचे फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल