कॅल्शियम, प्रथिनं, व्हिटॅमिन डी आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड असे सर्व घटक असलेला आहार घेतला तर हाडं मजबूत होतात आणि मज्जातंतूंचं कार्य सुधारतं. तसंच सूर्यप्रकाशात वेळ घालवणं आणि संतुलित आहार घेणं हे संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी कोणते पदार्थ उपयुक्त ठरू शकतात पाहूया.
कॅल्शियम समृद्ध आहार -
कॅल्शियम हा हाडांचा मुख्य घटक आहे. त्यामुळे हाडं मजबूत होतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात आणि ऑस्टियोपोरोसिससारखे आजार होऊ शकतात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच दही, चीज, तसंच हिरव्या पालेभाज्या पालक, बदाम, तीळ, टोफू आणि सोया उत्पादनांचं सेवन करा.
advertisement
Hair care : केस का गळतात ? या चुका टाळा, केस गळणं थांबवा
व्हिटॅमिन डी -
कॅल्शियम शोषण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर तुम्ही कितीही कॅल्शियम घेतलं तरी ते परिणामकारक ठरणार नाही. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होऊ शकतात. कोवळा सूर्यप्रकाश अंगावर घ्या. अंड्यातील पिवळा बलक, सॅल्मन, ट्यूनाहारखे मासे खा, दूध प्या आणि तृणधान्यांचा आहारात समावेश करा.
प्रथिनं -
प्रथिनं केवळ स्नायूंसाठी नाही, तर हाडं आणि मज्जातंतूंसाठीही आवश्यक असतात. प्रथिनांच्या
पेशींची दुरुस्ती आणि मज्जातंतूंची रचना नीट राखण्यास मदत करतात. अंडी, चिकन, मासे, कडधान्यं, चणे, राजमा, शेंगदाण्यांचं सेवन करा.
एक-दोन नव्हे 200 पेक्षा अधिक आजार दूर राहतील; आठवड्यातून फक्त एकदाच करा हे काम
ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् -
ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् मज्जातंतूंचं कार्य सुधारतात आणि त्यांचं संरक्षण करतात. त्याचबरोबर सूज कमी करणं आणि त्यांना निरोगी ठेवण्यात मदत करते. यासोबतच हाडांनाही मजबुती मिळते. सॅल्मनसारखे मासे, चिया सीड्स, जवस, अक्रोड, सोयाबीन आणि त्याचे तेलाचा आहारात समावेश करा.
मॅग्नेशियम -
कॅल्शियमसह मॅग्नेशियमही हाडं मजबूत करण्यास मदत करते. तसंच मज्जातंतूंचं कार्य योग्य पद्धतीनं करण्यासाठी याचा उपयोग होतो. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे, मज्जातंतूंच्या समस्या आणि हाडं कमकुवत होऊ शकतात. हिरव्या पालेभाज्या, ड्राय फ्रुट्स, तसंत बिया, एवोकॅडोचा आहारात समावेश करा.
व्हिटॅमिन बी 12 आणि फोलेट -
व्हिटॅमिन बी 12 आणि फोलेट मज्जातंतूंच्या दुरुस्तीसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक आहेत. त्यांच्या कमतरतेमुळे मज्जातंतूंमध्ये कमजोरी येणं आणि वेदना होऊ शकतात. अंडी, मांस आणि मासे, दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा.
झिंक/ जस्त -
शरीरातील हाडांच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी झिंक आवश्यक आहे. हे हाडांच्या ऊतींना मजबूत करण्यास आणि त्यांची घनता राखण्यास मदत करते. भोपळ्याच्या बिया, मांस, मासे, संपूर्ण धान्य, काजू खाऊ शकता.
आहारात मोठे बदल करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.