Hair care : केस का गळतात ? या चुका टाळा, केस गळणं थांबवा

Last Updated:

केस विंचरणं सोपं वाटत असलं तरी काही वेळा ते चुकीच्या पद्धतीनं विंचरले जात असतील तर ते केस गळण्यासही कारणीभूत ठरू शकतं.

News18
News18
मुंबई : आपल्या केसांच्या रचनेवर आपलं दिसणं अवलंबून असतं आणि आपण केस कसे विंचरतो यावर केसांचं आरोग्य. कारण अशा अनेक लहानसहान सवयी असतात ज्यामुळे केस गळतात. केस विंचरणं सोपं वाटत असलं तरी काही वेळा ते चुकीच्या पद्धतीनं विंचरले जात असतील तर ते केस गळण्यासही कारणीभूत ठरू शकतं.
आपण आपल्या केसांची खूप विचारपूर्वक काळजी घेतो. केसांना काय लावायचं, तेल कधी वापरायचं, तेल लावायचं की नाही, कोणता शॅम्पू वापरायचा, केसांना कोणते मास्क लावायचे किंवा कोणते घरगुती उपाय वापरायचे आणि कोणते करू नये अशा अनेक गोष्टी. पण, आपण अनेकदा छोटीशी चूक करतो. ते म्हणजे केस नीट न विंचरणं.
केस खूप वेळ विंचरणं -
advertisement
केस एकदा नीट सेट झाले की परत परत केस विंचरणं ही चूक नुकसान करु शकते. कारण यामुळे केस गळू शकतात. यामुळे अनेक वेळा टाळूवर ओरखडे दिसू लागतात, ज्यामुळे केस खराब होतात.
ओले केस विंचरणं -
केस ओले असतात तेव्हा ते मुळापासून कमकुवत होतात आणि अशा वेळी केस विंचरल्यानं केस गळण्याची
advertisement
शक्यता जास्त असते. म्हणूनच ओले केस विंचरणं टाळावं आणि ओल्या केसांऐवजी नेहमी केस कोरडे झाल्यावर
विंचरण्याकडे लक्ष द्या.
दुसऱ्याचा कंगवा वापरणं-
स्वत:च्या ऐवजी दुसऱ्याचा कंगवा वापरला तर टाळूला संसर्ग होण्याचा धोका वाढतो. टाळूवर खाज सुटणं
किंवा बुरशीजन्य संसर्गामुळे केस गळतात आणि केसांमध्ये उवा -लिखा होऊ शकतात.
केस चुकीच्या पद्धतीनं विंचरणं -
advertisement
बरेच जण चुकीच्या पद्धतीनं केस विंचरल्यानं केसांचं नुकसान होतं. केस नेहमी वरपासून खालपर्यंत विंचरावेत,
खालपासून विंचरले तर केस अडकतात आणि गुंता सोडवण्यासाठी बराच वेळ विंचरावे लागतात.
मुळांपासून केस जोरात विंचरणं-
केस मुळापासून आणि जोरात विंचरणं केसांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. मुळांपासून केस जोरात विंचरले तर
केस गळू शकतात त्यामुळे केस कमकुवत होऊन तुटायला लागतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair care : केस का गळतात ? या चुका टाळा, केस गळणं थांबवा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement