TRENDING:

LDL : वाईट कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा आहारात बदल, कॉलेस्ट्रॉल पातळी राहिल नियंत्रणात

Last Updated:

आहारात आवश्यक बदल केले नाहीत तर वाईट कोलेस्ट्रॉल कमी करणं कठीण होतं. कोणते अन्नपदार्थ वाईट कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यानं रक्तवाहिन्यांचं हळूहळू नुकसान होतं. यासाठी, आहारात काही पदार्थांचा समावेश करता येईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शरीर निरोगी राहण्यासाठी कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते. कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असतात, एक चांगलं ज्याला HDL म्हणतात आणि दुसरं वाईट असतं ज्याला LDL म्हणतात. कोलेस्ट्रॉलची ही एक प्रकारची चरबी जी शरीर तयार करते. अनेक अन्नपदार्थांमधे देखील हा घटक आढळतो.
News18
News18
advertisement

आहारात आवश्यक बदल केले नाहीत तर वाईट कोलेस्ट्रॉल कमी करणं कठीण होतं. याबद्दल, माहिती देणारा व्हिडिओ रक्तवहिन्यासंबंधी सर्जन आणि व्हेरिकोज व्हेन्स तज्ज्ञ डॉ. सुमित कपाडिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.

Stale Food : यकृताचं आरोग्य अन्नावर अवलंबून, ताजं अन्न खाण्याचं महत्त्व ओळखा, वाचा सविस्तर

कोलेस्ट्रॉल वाढल्यानं रक्तवाहिन्यांचं हळूहळू नुकसान होतं. कोणते अन्नपदार्थ वाईट कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात. यासाठी, आहारात काही पदार्थांचा समावेश करता येईल.

advertisement

मेथीचे दाणे - घरात हमखास मिळणारा पदार्थ. मेथीचे दाणे जेवणाची चव वाढवतात आणि आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. मेथीत विरघळणारं फायबर भरपूर प्रमाणात असतं. मेथीमुळे कोलेस्टेरॉल आतड्यांत साचतं आणि शरीर ते शोषू शकत नाही. रात्रभर भिजवून ठेवल्यानंतर मेथी सकाळी खाऊ शकता.

नारळ - नारळ खा पण कमी प्रमाणात..दररोज खाण्याऐवजी तुम्ही तो अधूनमधून खाऊ शकता. नारळ शरीरात चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्याचं काम करतो. ताजा नारळ किसून, खवून, ग्रेव्ही करुन विविध पदार्थांमधे वापरला जाऊ शकतो. नारळाचं तेल हाही एक चांगला पर्याय आहे. नारळ, नारळाचं तेल शरीरासाठी फायदेशीर असलं तरी त्याचं प्रमाण आटोक्यात ठेवा.

advertisement

भेंडी - भेंडी ही घराघरात वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाणारी भाजी. भेंडीत म्युसिलेज असतं. म्युसिलेज कोलेस्टेरॉलला रोखण्यासाठी आणि शरीरातून बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहे.

Teeth Care : दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी उपाय, नारळ तेल, लिंबाचा असा करा वापर

सफरचंद - सफरचंद शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ते यातल्या पेक्टिन आणि अँटिऑक्सिडंट्समुळे. सफरचंद खाल्ल्यानं यकृताचं कार्य सुधारतं आणि शरीरातील कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या कमी करण्यास उपयोग होतो. सफरचंदांव्यतिरिक्त, फायबरयुक्त पेरू किंवा व्हिटॅमिन सीयुक्त आवळा देखील खाऊ शकता.

advertisement

लसूण - कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण हा सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे. लसूण खाल्ल्यानं वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं तसंच रक्तदाब कमी होण्यासही मदत होते. दररोज कच्च्या लसणाच्या एक-दोन पाकळ्या खाऊ शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
LDL : वाईट कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा आहारात बदल, कॉलेस्ट्रॉल पातळी राहिल नियंत्रणात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल