Stale Food : यकृताचं आरोग्य अन्नावर अवलंबून, ताजं अन्न खाण्याचं महत्त्व ओळखा, वाचा सविस्तर

Last Updated:

सकाळी किंवा रात्री उरलेलं अन्न पुन्हा गरम करून खाण्याची सवय काहींना असते. काहींना असं करण्यावाचून पर्याय नसतो. पण, ही सवय तुमच्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवाला, यकृताला हानिकारक ठरु शकते.

News18
News18
मुंबई : वेळ वाचवण्यासाठी शिळं अन्न खाताय ? थांबा ही माहिती आधी वाचा. कारण लगेच नाही पण यामुळे कालांतरानं यकृताला धोका पोहचू शकतो.
सकाळी किंवा रात्री उरलेलं अन्न पुन्हा गरम करून खाण्याची सवय काहींना असते. काहींना असं करण्यावाचून पर्याय नसतो. पण, ही सवय तुमच्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवाला, यकृताला हानिकारक ठरु शकते.
यकृत हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव. रक्त स्वच्छ करणं, पोषक तत्वांवर प्रक्रिया आणि हानिकारक घटक काढून टाकण्याचं काम यकृत करतं. यकृतावर परिणाम झाला तर संपूर्ण शरीराचं कार्य बिघडू शकतं.
advertisement
शिळ्या अन्नाचा धोका  -
बॅक्टेरिया आणि बुरशीचा धोका: अन्न जास्त काळ उघड्यावर किंवा खोलीच्या सामान्य तापमानात असेल तर त्यात बॅक्टेरिया आणि बुरशी वाढू शकते.
अ‍ॅफ्लाटॉक्सिनची निर्मिती: बुरशीमुळे अफलाटॉक्सिन नावाचा विषारी पदार्थ तयार होतो, यामुळे हळूहळू यकृताचं नुकसान होऊ शकतं.
advertisement
पोषक तत्वांची कमतरता: अन्न वारंवार गरम केल्यानं अन्नातील जीवनसत्त्वे आणि खनिजं नष्ट होतात, ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही.
पचनाच्या समस्या: शिळं अन्न पचण्यासाठी कठीण होऊ शकतं, ज्यामुळे गॅस, अपचन आणि आम्लता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
शिळ्या अन्नाचा यकृतावर कसा परिणाम होतो ?
यकृताला विषारी घटक फिल्टर करावे लागतात, ज्यामुळे त्यावर अतिरिक्त दबाव येतो. शिळं अन्न जास्त काळ खाल्ल्यानं यकृताची कार्यक्षमता कमी होऊ शकते. ज्यामुळे फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस किंवा लिव्हर सिरोसिससारखे गंभीर आजार होऊ शकतात. मेयो क्लिनिकच्या एका अभ्यासानुसार, अफलाटॉक्सिनमुळे यकृताचा कर्करोग देखील होऊ शकतो.
advertisement
हा धोका कसा टाळायचा?
ताजं अन्न खा: प्रत्येक वेळी ताजं आणि गरम अन्न खाण्याचा प्रयत्न करा.
अन्नाची व्यवस्थित साठवणूक: अन्न उरलं असेल तर ते फ्रीजमधे ठेवा आणि चोवीस तासांच्या आत खा.
अन्न पुन्हा पुन्हा गरम करू नका: अन्न एकापेक्षा जास्त वेळा गरम केल्यानं त्यातले पोषक घटक नष्ट होतात.
अन्नाच्या वासाकडे आणि रंगाकडे लक्ष द्या: अन्न विचित्र दिसत असेल तर ते खाण टाळा.
advertisement
यकृत निरोगी ठेवण्यासाठी काय खावं ?
फायबरयुक्त पदार्थ: फळं, भाज्या आणि संपूर्ण धान्य.
हायड्रेशन: भरपूर पाणी आणि लिंबू पाण्यासारखी डिटॉक्स पेयं प्या.
अँटिऑक्सिडंट्स: आहारात हळद, ग्रीन टी आणि आवळ्याचा समावेश करा.
शिळ्या अन्नानं चव तर खराब होतेच पण यामुळे आरोग्याला आणि विशेषतः यकृतालाही हानी पोहोचवू शकते. त्यामुळे ताजं अन्न खाण्यावर भर द्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Stale Food : यकृताचं आरोग्य अन्नावर अवलंबून, ताजं अन्न खाण्याचं महत्त्व ओळखा, वाचा सविस्तर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement