सोलापूर - दिवाळीचा सण अवघ्या पाच-सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहारातील प्रमुख चौकात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होतेय. त्यामुळे बाजारात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकजण दिवाळीसाठी आकाश कंदील, पणती खरेदी करताना दिसत आहेत. यंदा बाजारात कोणत्या प्रकारच्या पणत्या आहेत? आणि त्यांचे दर काय आहेत? याबाबत पणती बनवून विकणाऱ्या मीराबाई कुंभार यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
मीराबाई कुंभार या सोलापूर शहारातील डफरीन चौक येथे पणत्या विक्री करतात. दिवाळी सण दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. सर्वाधिक दिवे लावून परिसर प्रकाशमय केला जातो. यासाठी पणत्या वापरल्या जातात. परंतु, पारंपरिक पद्धतीने वापरात असलेल्या मातीच्या पणत्यांची, आकर्षक दिसणाऱ्या प्लॅस्टिक, इलेक्ट्रिक पणत्यांनी जागा घेतली आहे. परिणामी मातीच्या पणत्या विक्रीवर परिणाम झालेला दिसून येतो.
सुंदर नक्षीकाम अन् मनमोहक रंगसंगती, दिवसाळीसाठी सोलापुरात चक्क मातीचे आकाश कंदील
या पणत्यांना मागणी
यंदा बाजारात विविध आकाराच्या पणत्या दाखल झाल्या आहेत. यामध्ये मोर, बदक, मासा, पान, स्वस्तिक, दीपमाळ, कासव, कंदील, तुळशी वृंदावन, घर, पाच दीप, सात दीप, कलश अशा विविध प्रकारच्या कलात्मक पणत्या उपलब्ध आहेत. तसेच वॉल हैंगिंग दिवे आणि काचेच्या दिव्यांनाही पसंती मिळत आहे. पाच पाकळी फुलांच्या आकाराच्या पणत्या बाजारात दाखल झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 20 टक्के दरवाढ झाली आहे.
30 वर्षानंतर राजयोग! 5 राशींचं भाग्य चमकणार, दिवाळीत माता लक्ष्मीची कृपा
पणत्यांची किंमत काय?
मातीपासून हाताने तयार केलेल्या विविध प्रकारच्या पणत्या नेहमीच दिवाळीचं आकर्षण असतं. या पणत्या कमी तेल पितात, किमान सहा तास त्या जळत राहतात. सध्या 30 ते 120 रुपयेपर्यंत किमतीच्या पणत्या उपलब्ध आहेत, असं मीराबाई यांनी सांगितलं. तसेच पणत्या विक्रीतून 8 दिविसांत 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत कमाई होते, असंही त्या सांगतात.
दरम्यान, घराची शोभा वाढवणारे विविध आकर्षक स्टिकरही बाजारात आले आहेत. यात शुभ लाभ, स्वस्तिक, पावले, श्री आणि इतर सजावट साहित्यांचा समावेश आहे.