सकाळी उठल्यावर ब्रश करू नका, असं चक्क डॉक्टर सांगतायेत हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटल असेल. असा अजब सल्ला देणाऱ्या या डेंटिस्टनी त्यामागील कारणही सांगितलं आहे. पुण्यातील डेंटिस्ट डॉ. कश्मीरा जठार यांनी एका पॉडकास्टवर ही माहिती दिली आहे. सकाळी उठल्यावर दात का घासू नयेत हे त्यांनी स्पष्ट करून सांगितलं आहे.
शाहरूख-रणबीर, आलिया-दीपिका हसतात, तशी स्माईल आपल्यालाही करता येऊ शकते का?
advertisement
डॉ. कश्मीरा जठार म्हणाल्या, सकाळी उठल्या उठल्या ब्रश करणं हा आपल्या सवयीचा भाग आहे. आपल्याला असं वाटतं की मी उठल्या उठल्या ब्रश करायला हवं. पण याला काहीच अर्थ नाही. कारण तुमचं तोंड रात्रभर बंदच आहे. तोंडात काही गेलंच नाही आहे.
पण तुम्ही एकदा ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर तुम्हाला शाळा, कॉलेज, ऑफिसला जायचं असतं. त्यावेळी तोंडातून दुर्गंधी येऊ नये असं वाटतं. त्यामुळे ब्रेकफास्ट केल्यानंतर ब्रश करण्याला अर्थ आहे आणि त्याचा उपयोग आहे.
Cancer : कॅन्सरमुळे गेलेले केस परत येतात का? तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं उपचारानंतर काय होतं
उलट रात्री ब्रश करून झोपलात आणि सकाळी उठलात तेव्हा खरंतर तुमचं तोंड फ्रेश असतं. तुम्ही फक्त चूळ भरून तुमचा ब्रेकफास्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही ब्रश केला तर तुम्हाला ताजंतवानं वाटेल आणि तुमच्यात आत्मविश्वासही येईल. त्यामुळे रात्री झोपताना ब्रश आणि सकाळी ब्रेकफास्टनंतर ब्रश ही सवय जास्त योग्य आहे, असं त्या म्हणाल्या.
दात घासायची योग्य पद्धत
तज्ज्ञ सांगतात, ब्रश करणं हे फक्त दातांमधील घाण काढण्यासाठीच नाही, तर हिरड्यांमधील रक्ताभिसरणासाठीही आवश्यक आहे. कारण त्यामुळे दात निरोगी राहतात. हिरड्यांची पकड मजबूत राहिली पाहिजे. त्यामुळे दात नेहमी मऊ ब्रशने आणि वर्तुळाकार गतीने घासावे. गोलाकार हालचालीत ब्रश हलवावा. जेणेकरून दात पूर्णपणे स्वच्छ होतात आणि हिरड्यांचे आरोग्यही मजबूत राहतं.
