मामाची मुलगी आणि आत्याच्या मुलाशी लग्न करू नये, असं सांगितलं जातं. तेव्हा त्या मुलाला आणि मुलीला असे सांगणारे प्रेमाचे दुश्मन वाटतात. अगदी त्यांच्या लग्नाला विरोध करणारं कुटुंबही त्यांच्यासाठी शत्रू बनतं. काय होतंय? असं आपल्याला वाटतं. पण डॉक्टरही हे योग्य असल्याचं सांगतात. यामागील नेमकं कारण काय, नात्यात लग्न केल्याने काय होतं? हे सातऱ्याच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
advertisement
बडेबडे सेलिब्रिटी हे औषध सोबत ठेवतातच; कोणतं आणि का? कोल्हापूरच्या डॉक्टरांनी सांगितलं
साताऱ्याच्या डॉ. प्रियांका साळुंखे यांनी सांगितलं, नात्यात लग्न का करू नये, याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे जेनेटिक डिसॉर्डर, जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. त्यासाठी नात्यात लग्न टाळलं जातं. नात्यात लग्न म्हणजे जेनेटिकचं रिपिटेशन.
नात्यात लग्न केल्याने होतात 'दिव्यांग' मुलं?
ब्रिटनमधील कट्टरपंथी कार्यकर्ता टॉमी रॉबिन्सन यांनी याआधी एक व्हिडिओ शेअर करून दावा केला आहे की, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी समुदायामध्ये चुलत भावंडांमधील विवाहाचे प्रमाण खूपच जास्त आहे आणि यामुळेच त्यालोकांमध्ये जन्मजात दोष (Birth Defect) मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
रॉबिन्सन यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिटनच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 3% इतका असलेला पाकिस्तानी समाज आहे आणि त्यात 33% मुलांमध्ये जन्मदोष आढला आहे. त्यांनी दावा केला की, या समाजातील तब्बल 76% लोक फर्स्ट कझिन म्हणजेच चुलत भावंडांशीच लग्न करतात.
त्यांच्या या वक्तव्यानंतर ब्रिटनमध्ये फर्स्ट कझिन मॅरेजबाबत तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. काही लोक रॉबिन्सन यांच्या भूमिकेचे समर्थन करत आहेत, तर काही लोक याला इस्लामोफोबिया आणि सामाजिक विद्वेष मानत आहेत.
वैज्ञानिक काय सांगतात?
तज्ज्ञांच्या मते, फर्स्ट कझिन मॅरेजमुळे होणाऱ्या संततीमध्ये आनुवंशिक आजार होण्याचा धोका सामान्य लग्नांपेक्षा दुपटीने जास्त असतो. कारण जरी रक्तगट वेगळा असला, तरी आनुवंशिक रचना (Genetic structure) फारशी वेगळी नसते. परिणामी थॅलेसीमिया, मायक्रोसेफली, डॉमिनंट किंवा रिसेसिव जेनेटिक डिसऑर्डर अशा अनेक गंभीर आजारांचा धोका असतो.
जगात कुठे सर्वाधिक फर्स्ट कझिन मॅरेज?
जगभरात अनेक देशांमध्ये फर्स्ट कझिन मॅरेज केल्या जातात, विशेषतः इस्लामिक देशांमध्ये ही प्रथा अधिक आहे. पाकिस्तानमध्ये सर्वाधिक सुमारे 61.2% कझिन मॅरेज होतात. त्यानंतर कुवैत (54.3%), कतार, यूएई, अफगाणिस्तान, सुदान यांसारख्या देशांचा क्रम लागतो.
