बडेबडे सेलिब्रिटी हे औषध सोबत ठेवतातच; कोणतं आणि का? कोल्हापूरच्या डॉक्टरांनी सांगितलं

Last Updated:

Celebrity Medicine : कोल्हापूरच्या डॉक्टरांनी सेलिब्रिटींचं हे सीक्रेट सांगितलं आहे. आता ते औषध कोणतं आणि त्याचा फायदा काय? हेसुद्धा डॉक्टरांनी सांगितलं आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
कोल्हापूर : बाम, विक्स, आयोडेक्स, क्रोसिन किंवा डोलोसारखं पेनकिलर गोळ्या आणि पेनकिलर स्प्रे, बँडेज अशी काही औषधं आपल्या घरात असतात. कुठे बाहेर गेल्यावर प्रवासातही आपण आपल्या बॅगेत ती सोबत ठेवतो. जेणेकरून आपल्याला काही समस्या उद्भवल्यावर तात्पुरते उपचार करता येतील. पण एक असं औषध जे बडेबडे सेलिब्रिटी हमखास सोबत ठेवतात.
सेलिब्रिटींबाबत जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. ते कोणत्या ब्रँडचे कपडे घालतात, काय खातात, काय पितात, त्यांचं घर कसं आहे? पण सेलिब्रिटींचे सगळेत सीक्रेट आपल्याला माहिती होतील असं नाही. असंच एक सीक्रेट म्हणजे औषधाचं. बडेबडे सेलिब्रिटी एक औषध आपल्या सोबत ठेवतात. कोल्हापूरच्या डॉक्टरांनी सेलिब्रिटींचं हे सीक्रेट सांगितलं आहे. आता ते औषध कोणतं आणि त्याचा फायदा काय? हेसुद्धा डॉक्टरांनी सांगितलं आहे.
advertisement
डॉ. प्रिया दंडगे असं या डॉक्टरचं नाव. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार त्या होमिओपॅथिक डॉक्टर, वेटलॉस कन्सलटंट, फ्लॉवर रेमेडी प्रॅक्टिशनर आहेत. तसंच एका व्हिडीओ त्यांनी त्या डाएट आणि न्यूट्रिशन एक्सपर्ट असून कोल्हापुरात त्यांचं एक क्लिनक असल्याचंही नमूद केलं आहे. त्यांनी एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सेलिब्रिटींकडे असलेल्या या औषधाबाबत सांगितलं आहे.
advertisement
डॉ. प्रिया दंडगे यांनी सांगितलं, पुष्पा पद्धतीतील एक औषध जे बऱ्याचशा सेलिब्रिटींकडे असतंच असतं. कामामुळे स्ट्रेस खूप येतो आणि हे औषध घेतलं की तात्काळ म्हणजे अगदी 10 मिनिटांत बरं वाटतं. जेव्हा पॅनिक अटॅक येतात किंवा अचानक स्ट्रेस येतो. उदाहरणार्थ तुम्हाला एखादा फोन आला आणि तुम्हाला एखादी बॅड न्यूज मिळाली. तर तुमचं हार्ट, बीपी सगळं वेगळ्या मोडला जातं. स्ट्रेस लेव्हलला जातं. तेव्हा या औषधाचे 4 थेंब पाण्यात टाकून ते प्यायचं आणि सगळं नॉर्मल होतं. जी काही परिस्थिती तुमच्या आयुष्यात आली आहे तिला सामोरं जाण्यासाठी तुमचे बाकीचे सेन्सेस काम करतात. तुम्ही समतोल राहून काही निर्णय घेऊ शकता.
advertisement
आता हे औषध कोणतं हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर रेस्क्यू रेमिडी असं या औषधाचं नाव. पुष्पा औषधीमधल्या 5 औषधांचं हे कॉम्बिनेशन आहे, असं डॉ. दंडगे यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
बडेबडे सेलिब्रिटी हे औषध सोबत ठेवतातच; कोणतं आणि का? कोल्हापूरच्या डॉक्टरांनी सांगितलं
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement