जाणून घेऊयात या कोट्यवधींच्या नेलपेंटबद्दल
नेलपेंट इतकी महाग का ?
ही नेलपॉलिश खूप महाग आहे कारण ती एका लक्झरी ज्वेलरी डिझायनरने तयार केली असून त्यात दुर्मिळ हिऱ्यांचा वापर करण्यात आलाय. याशिवाय जगातल्या इतर महागड्या नेलपॉलिशही त्यात असलेली प्लॅटिनम पावडर आणि खास आकाराच्या बाटल्यांमुळे प्रसिद्ध आहेत.
फॅशन डिझायनर कोण ?
ब्लॅक डायमंड किंग म्हणून ज्यांची ओळख आहे असे लॉस एंजेलिसचे डिझायनर ॲझेचर पोगोस्यान यांनी ही महागडी नेलपेंट तयार केलीये. त्यांनी या नेल पॉलिशचे नाव पण ‘ॲझेचर’ असंच ठेवलंय.
advertisement
नेलपेंटमध्ये हिरे
होय तुम्ही वाचलं ते खरं आहे. हिराची गणना ही जगातल्या अनेक महाग वस्तूंमध्ये होते. हिऱ्याचं कॅरेट जितकं जास्त तितकी त्याची किंमत जास्त. हा नियम जर हिऱ्याला लागू असेल तर ब्लॅक डायमंडच्या बाबतीत तर बोलायलाच नको. आधी सांगितल्याप्रमाणे ॲझेचर पोगोस्यान यांची ओळख ही ब्लॅक डायमंड किंग आहे. त्यामुळे नेलपेट लावल्यानंतर तिला चकाकी येण्यासाठी पोगोस्यान यांनी त्यात ब्लॅक डायमंड म्हणजेच काळ्या हिऱ्यांचा वापर केलाय.
किंमत
या महागड्या एका नेलपेंटमध्ये 267 काळे हिरे आहेत.ज्यांची किंमत सुमारे अडीच लाख अमेरिकन डॉलर्स ($2,50,000) म्हणजेच जवळपास 1 कोटी 90 लाख रूपये आहे.
वापर कोणाकडून ?
वर सांगितल्या प्रमाणे गर्भश्रीमंत व्यक्तींना अनेक प्रकारचे छंद किंवा आवड असते. हिरा हा 99 टक्के महिलांचा आवडता दागिना, अशातच सौंदर्य वाढवण्याच्या एका महागड्या नेलपेंटमध्ये हिरा असणं कोणाला नाही आवडणार. त्यामुळे ही नेलपॉलिश महागडी जरी असली तरीही अनेक मॉडेल, व्यावसायिक, अभिनेत्री आणि गर्भश्रीमंत महिलांनी या नेलपेंटला पसंती दिल्याचं कळतंय.
