त्यातही वाढत्या वयात त्याच्या खुणा आपल्या त्वचेवर दिसू नये, यासाठी खूप लोक प्रयत्न करत असतात. वय जसजसं वाढत जात तशा आपल्या चेहऱ्यावर त्याच्या खुणा म्हणजेच बारीक रेषा किंवा सुरकुत्या दिसायला लागतात. काहीवेळा चुकीच्या स्किनकेअरमुळे किंवा खराब जीवनशैलीमुळे चेहऱ्यावर हे बदल लवकरही होऊ शकतात. म्हणूनच तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायद्याचं ठरतं.
डॉ. मनीष भानुशाली यांनी theoddeven.media या इंस्टाग्राम चॅनलला दिलेल्याएका मुलाखतीमध्ये एजिंगच्या खुणा कमी करण्याबद्दल माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितलं की, हल्ली बायोलॉजिकल एज आणि प्रेझेन्ट एजमध्ये खूप फरक दिसतो. म्हणजेच बऱ्याचदा लोक 40 वर्षांचे असताना 50 वर्षाचे दिसतात. यावर आपण योग्यवेळी गोष्टी करून, आपल्या योग्य वयाचे दिसू शकतो. म्हणजेच चेहऱ्यावर वाढलेलं वय दिसणार नाही.
advertisement
एजिंगचा वेग कमी करण्यासाठी हे करा..
एजिंग आपण रोखू शकत नाही. पण त्याचा प्रभाव आणि वेग मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो. यासाठी तुमच्या आहारात जास्त प्रमाणात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. तुमचं प्रोटीन कन्टेन्ट हाय ठेवा. प्रोटीन कन्टेन्ट हाय ठेवणं म्हणजे भरपूर कडधान्य खाणं. त्याचबरोबर रोज सॅलड खाण्याची सवय लावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी जास्त प्रमाणात प्या. दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी शरीरात जायला हवं.
एजिंगचा वेग कमी करण्यासाठी या गोष्टी टाळा..
तुम्हाला तुमच्या वयापेक्षा मोठं दिसायचं नसेल, तर यासाठी सर्वात आधी अँटीऑक्सिडेशन करायला लागेल. अँटीऑक्सिडेशन म्हणजे आहारातलं तेल आणि मसाला कमी करा. तेल आणि मसाला कमी केल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर खूप बदल दिसेल. त्याचबरोबर तुम्हाला चिप्स, बर्गर, फ्राईज असे जंक फूड खाणं करावं लागेल.
या सर्व गोष्टी करून तुमचं अजिंगचं कमी करू शकता. म्हणजेच एजिंगचा वेग कमी करू शकता. वयानुसार शरीरात बदल होणं निश्चित आहे. पण योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप.. या सर्व गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलंत तर तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम पाहायला मिळतात.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
