अभ्यासातून काय समोर आलं?
रंग आणि मानवी स्वभाव यांचा अभ्यास करणाऱ्या शाखेला 'कलर सायकॉलॉजी' म्हटलं जातं. कलर सायकॉलॉजीनुसार, रंग आपल्या भावना, विचार आणि स्वभावाशी जोडलेले असतात. 2009 मध्ये ब्रिटीश कोलंबिया युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनात वेगवेगळे रंग व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात असं आढळून आलंय. लाल रंगाच्या वातावरणात लोक अधिक सावधगिरीनं आणि काळजीपूर्वक काम करतात, तर निळ्या रंगाच्या सानिध्यात त्यांची कल्पकता वाढते, असं या अभ्यासातून समोर आलंय.
advertisement
रंगाचा खरंच 'मूड'वर परिणाम होतो?
या अभ्यासानुसार, आपण जे कपडे परिधान करतो त्याचा आपल्या वागण्यावर सूक्ष्म प्रमाणात परिणाम होऊ शकतो. या अभ्यासानुसार, लाल रंग हा रंग ऊर्जा, उत्साह आणि काहीसा आक्रमकता दर्शनवतो. त्यामुळे या रंगाचे कपडे घातल्यास ती व्यक्ती अधिक 'अलर्ट' किंवा सतर्क वाटू शकते, तर निळ्या रंगाचे कपडे घातलेली व्यक्ती शांत स्वभावीची वाटू शकते. याचप्रमाणे पिवळा रंग आनंद आणि आशेचा प्रतीक मानला जातो. हा या रंगाचे कपडे घातल्यास तुमचा उत्साह वाढू शकतो आणि तुम्हाला अधिक प्रसन्न वाटू शकतं.
'डोपामिन ड्रेसिंग'चा नवा ट्रेंड
सध्या फॅशनच्या जगात 'डोपामिन ड्रेसिंग' हा शब्द खूप चर्चेत आहे. डोपामिन हे आपल्या मेंदूतील 'फील गुड' हार्मोन आहे. हे आर्मोन आपल्याला आनंदी करण्याचं काम करतं. आपण आपल्या आवडीचे किंवा भडक रंगाचे कपडे घातल्यानंतर अतिशय प्रसन्न, उत्साही आत्मविश्वासू वाटू लागतं. नव्या कपड्यांसोबतच कपड्यांच्या रंगांचाही आपल्या मूडवर परिणाम होतो, हेच या अभ्यासातून समोरं आलं.
कोणतेही ठराविक सूत्र नाही
रंगांचा मूडवर परिणाम होत असला तरी वैज्ञानिकदृष्या यासाठी कोणताही ठराविक नियम नाही. म्हणजे तुम्ही आमुक रंगाचे कपडे घातल्यास तुम्हाला प्रसन्नच वाटेल असे नाही. कारण एखाद्या व्यक्तीला लाल रंग धोक्याचा इशारा वाटू शकतो, तर दुसऱ्याला तो प्रेमाचे प्रतीक वाटू शकतो. त्यामुळे रंगाचा परिणाम हा व्यक्तीच्या स्वभावावर आणि त्याच्या भूतकाळातील अनुभवांवर अवलंबून असू शकतो. परंतु बहुतांश वेळ वेगवेगळ्या रंगांचा नकळत तुमच्या मूडवर परिणाम होत असतो.
तुम्ही कोणते कपडे निवडू शकता?
कपड्यांचा रंग तुमच्या मूडवर नक्कीच प्रभाव पाडतो, पण तो परिस्थिती, तुमच्या सवयी आणि विचारांनुसार बदलू शकतो असं ब्रिटीश कोलंबिया युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासातून समोर आलंय. त्यामुळं आता पुढच्या वेळी तुम्ही देखील कपडे निवडताना फक्त स्टाईलचा विचार न करता, रंगाचाही विचार करू शकता. तुम्हाला आवडणारे आणि तुम्हाला प्रसन्न वाटणारे रंग निवडल्यास तुमचा आत्मविश्वास देखील वाढू सकतो. तसेच तुम्ही कोणत्या रंगांचे कपडे घातल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं, यावर देखील तुम्ही यापुढे लक्ष्य द्यायला हवं. यामुळं तुम्हाला तुमच्या आवडीचे रंग निवडण्यास मदत होऊ शकते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
