अशाप्रकारे प्रत्येक 4 पैकी एक प्रौढ व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे. परंतु त्यापैकी बहुतेकांना हे देखील माहित नाही की त्यांना उच्च रक्तदाब आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे अनेक बाबतीत एकमेकांशी संबंधित असतात. त्यामुळे अनेकदा मधुमेह असलेल्या व्यक्तीलाही उच्च रक्तदाब असतो. पण नोकरी करणाऱ्या लोकांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो का? असा प्रश्न आम्ही मॅक्स हेल्थकेअर गुडगाव येथील डायबेटोलॉजिस्ट डॉ. पारस अग्रवाल यांना विचारला. जाणून घेऊया ते काय म्हणाले.
advertisement
कोणाला असतो जास्त धोका?
डॉ. पारस अग्रवाल म्हणाले की, मधुमेह किंवा उच्च रक्तदाबासाठी वाईट जीवनशैली कारणीभूत आहे. मात्र नोकरदारांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असल्याचे अद्याप समोर आलेले नाही. जे लोक नियमित शारीरिक हालचालींमध्ये कमी रस घेतात, अस्वास्थ्यकर अन्न खातात, जास्त ताणतणाव किंवा नैराश्यात असतात, त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो.
परंतु याचा अर्थ असा नाही की, सर्व जॉब किंवा नोकरी करणाऱ्या लोकांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असेल. डॉ. पारस अग्रवाल यांनी सांगितले की, मधुमेह पूर्णपणे जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींशी संबंधित आहे आणि ज्यांची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी योग्य नाहीत त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका नक्कीच जास्त असतो.
नोकरदार लोक अशा प्रकारे रक्तदाब टाळू शकतात मधुमेह आणि उच्च...
मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे दोन्ही जीवनशैलीशी संबंधित आजार आहेत. त्यामुळे जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी सुधारल्या तरच हे आजार दूर होतील किंवा त्यांचा धोका कमी होईल. म्हणूनच जर तुम्ही नोकरी करणारी व्यक्ती असाल तर सर्वप्रथम तुमच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली सुधारा. यासाठी लवकर झोपा, लवकर उठा आणि व्यायाम आणि शारीरिक हालचाली रोज नियमित वेळेत करा.
चालणे, सायकल चालवणे, पोहणे, धावणे हा जीवनशैलीशी संबंधित आजारांपासून दूर राहण्याचा उत्तम मार्ग आहे. यासोबतच हंगामी हिरव्या भाज्या, फळे इत्यादींचे नियमित सेवन करा. सिगारेट आणि दारूपासून दूर राहा. ताण घेऊ नका. रात्री पुरेशी झोप घ्या. ऑफिसमध्ये पायऱ्या वापरा. दर अर्ध्या किंवा एक तासाने खुर्चीवरून उठून चालत जा. खुर्चीवर बसूनही तुम्ही काही व्यायाम करू शकता. यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.