TRENDING:

वकिलीचं शिक्षण, पण आवड वेगळीच; सुरू केला स्वत:चा ब्रँड, सेलिब्रिटींचीही लागतेय रांग

Last Updated:

Women Shopping: वकिलीचं शिक्षण घेतलेल्या शलाका पाटकर यांनी स्वत: चा बॅग ब्रँड सुरू केला आहे. फक्त 100 रुपयांपासून इथं आकर्षक बॅग मिळतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी
advertisement

डोंबिवली: सध्या अनेक उच्चशिक्षित तरुण-तरुणी व्यवसायाकडे वळत आहेत. डोंबिवलीतील शलाका पाटकर या तरुणीने सुध्दा वकिलीतून शिक्षण पूर्ण केले आहे. परंतु, तिची आवड मात्र फॅशन आणि डिझायनिंगमध्ये होती. म्हणून तिने स्वतःचे कोरल ब्लश नावाचे बॅग ब्रँड सुरू केले. आता ती वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर हॅन्डबॅग विकते. याची किंमत फक्त 300 रुपयांपासून सुरू होते. अनेक मराठी मालिकांमध्ये तिच्या बॅग्स हमखास वापरल्या जातात. अनेक मराठी कलाकार सुद्धा आवर्जून तिच्याकडे बॅग खरेदीसाठी येतात. याबाबतच पाटकर यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.

advertisement

डोंबिवली स्थानकापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर कोरल ब्लश हे दुकान आहे. या दुकानात अगदी 100 रुपयांपासून सुंदर छोट्या पर्सेस मिळतील. इथे मिळणाऱ्या सगळ्या हॅन्ड बॅग उत्तम दर्जाच्या असून महिलांची याला खूप पसंती मिळत आहे. फॅशनेबल आणि सुंदर कलर असणाऱ्या या बॅग पार्टीवेअर लुकवर खूप शोभून दिसतात. यामध्ये सुंदर कलर्स देखील आहेत. त्यामध्ये पीच, गुलाबी, पिस्ता असे युनिक कलर असल्यामुळे या पर्सेस उठावदार दिसतात.

advertisement

होलसेल भावात खरेदी करा ट्रेंडिंग कुर्ती, मिळतील वेगवेगळे प्रकार, डोंबिवलीतलं हे ठिकाण माहितीये का?

लग्न समारंभांमध्ये अनेक जण डिझाईनेबल पर्सेस वापरणं पसंत करतात. इथे या सुंदर भरलेल्या हँड पर्सेस फक्त 500 रुपयांपासून मिळतील. सध्या हळदी कुंकू समारंभ सुद्धा सुरू आहेत. हळदी-कुंकवामध्ये पर्स देण्याची इच्छा असेल तर इथे तुम्हाला अगदी 150 रुपयांपासून पोटली सुद्धा मिळेल. यामध्ये खूप रंग सुद्धा उपलब्ध आहेत. शलाकाने या बॅग्स बरोबरच एविल आय ही युनिक कन्सेप्ट असणारी बॅग सुद्धा लाँच केली आहे. याची किंमत फक्त 1200 रुपये पासून सुरू होते.

advertisement

फॅशनमध्ये आवड

“मी लॉ मधून शिक्षण पूर्ण केल्यावर फॅशनमध्ये आवड असल्यामुळे या क्षेत्राकडे वळली. मुलींना आणि महिलांना परवडेल अशा किमतीमध्ये सुंदर आणि फॅशनेबल पर्सेस मिळाव्यात हा माझा हेतू होता. कोरल ब्लश या माझ्या ब्रँडच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या युनिक पर्सेस नेहमीच लॉन्च करत असते. गेल्या 7 वर्षांच्या काळात डोंबिवलीकरांचा मला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे,” असे व्यावसायिका शलाका पाटकर हिने सांगितले.

advertisement

तुम्हाला सुद्धा तुमच्या सगळ्या लुकला उठावदार करतील अशा सुंदर पर्स खरेदी करायच्या असतील, तर आवर्जून डोंबिवली स्थानकापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या मानपाडा रोडवरील कस्तुरी प्लाझाच्या समोर कोरल ब्लश या दुकानाला भेट देता येईल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
वकिलीचं शिक्षण, पण आवड वेगळीच; सुरू केला स्वत:चा ब्रँड, सेलिब्रिटींचीही लागतेय रांग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल