शॉक रिस्पॉन्स
खूप गरम झालेल्या शरीरावर बर्फासारखं थंड पाणी प्यायल्याने मज्जासंस्थेला (nervous system) शॉक बसू शकतो. यामुळे कधीकधी चक्कर येणं किंवा रक्तदाब कमी होणं यासारख्या समस्या येऊ शकतात. सहसा लोक कडक उन्हातून घरी पोहोचताच लगेच फ्रिजमधून खूप थंड पाणी पितात, जे पूर्णपणे चुकीचं आहे.
डोकेदुखी किंवा मायग्रेन ट्रिगर होणे
उन्हात शरीर आधीच डिहायड्रेटेड (पाण्याची कमतरता) आणि गरम झालेलं असतं, त्यामुळे अचानक थंड पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास सुरू होऊ शकतो. या सवयी दीर्घकाळ ठेवल्यास तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतो आणि कालांतराने समस्या वाढू लागतात.
advertisement
रक्तवाहिन्या आकुंचन पावणे
थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे शरीराच्या काही भागात रक्ताभिसरण मंदावू शकतं. यामुळे शरीरात मुंग्या येणं किंवा बधिरपणा येऊ शकतो. तुम्हाला सांगतो की आपल्या शरीरात नसा महत्त्वाची भूमिका बजावतात, ज्या संपूर्ण शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
पचनक्रियेवर खोलवर परिणाम
उन्हातून परतल्यावर लगेच थंड पाणी प्यायल्याने शरीराच्या अंतर्गत तापमानात अचानक घट होते, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. यामुळे गॅस, अपचन आणि पोटदुखी होऊ शकते. जर तुम्हाला अशी सवय असेल, तर लगेच ही पद्धत बदला, जेणेकरून भविष्यात तुम्हाला आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
हृदयावर परिणाम
काही प्रकरणांमध्ये, अचानक थंड पाणी प्यायल्याने मृत्यूही होऊ शकतो. अचानक थंड पाणी प्यायल्याने हृदयाची धडधड अनियमित होऊ शकते. शरीर अचानक थंड झाल्यावर हृदयाला धक्का बसतो, ज्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे किंवा हृदय कमजोर होऊ शकते. जर तुम्ही या छोट्या सवयी सोडल्या नाहीत, तर येणाऱ्या काळात तुम्हाला अनेक शारीरिक समस्यांना नक्कीच सामोरे जावे लागेल.
हे ही वाचा : गॅस, अपचन सतावतंय? महागड्या औषधांचा नाद सोडा, ही 2 पानं तोंडात टाका अन् चमत्कार पाहा!
हे ही वाचा : 'या' व्हिटॅमिन्सची कमतरतेमुळे त्वचा होते डार्क, आहारात करा 'हा' मुख्य बदल, चेहऱ्यावर येईल नवं तेज
