advertisement

'या' व्हिटॅमिन्सची कमतरतेमुळे त्वचा होते डार्क, आहारात करा 'हा' मुख्य बदल, चेहऱ्यावर येईल नवं तेज

Last Updated:

त्वचेला नैसर्गिक नूर मिळावा असं वाटतं, पण जर ती डल, काळसर किंवा निस्तेज दिसत असेल, तर यामागे व्हिटॅमिन बी12 आणि डी यांची कमतरता असू शकते. बी12 कमी असल्यास चेहऱ्यावर पिग्मेंटेशन, डोळ्यांखाली...

Vitamin B12 for skin
Vitamin B12 for skin
आपल्या सगळ्यांना हवं असतं की, आपली त्वचा निरोगी, चमकदार आणि एकसारख्या रंगाची असावी. पण अनेकदा असं दिसून येतं की त्वचेचा रंग हळूहळू काळवंडू लागतो, चेहरा निस्तेज दिसतो आणि नैसर्गिक चमक नाहीशी होते. यामागे अनेक कारणं असू शकतात, जसे की ताणतणाव, जास्त वेळ उन्हात राहणे, झोप कमी होणे किंवा हार्मोन्सचं असंतुलन. पण यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे व्हिटॅमिन्सची कमतरता, खासकरून व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता.
...यामुळे मेलेनिनचं संतुलन बिघडू शकतं
हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, शरीरातील लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी, डीएनए उत्पादनासाठी आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी व्हिटॅमिन बी12 खूप आवश्यक आहे. पण जर त्याची कमतरता झाली, तर त्वचेवर त्याचा परिणाम स्पष्ट दिसतो. यामुळे त्वचेचा रंग असमान होतो. चेहऱ्यावर पिगमेंटेशन आणि गडद डाग दिसू लागतात आणि त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसते. व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे मेलेनिनचं संतुलन बिघडू शकतं, ज्यामुळे डोळ्यांखालील आणि ओठांच्या आसपासच्या भागांमध्ये त्वचा गडद दिसते.
advertisement
व्हिटॅमिन डी ची कमतरताही कारण असू शकते
व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशातून मिळतं, पण जर तुम्ही सूर्यप्रकाशापासून दूर राहत असाल किंवा घरात जास्त वेळ घालवत असाल, तर त्याची कमतरता होऊ शकते. हे व्हिटॅमिन त्वचेच्या पेशींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळेही त्वचा निर्जीव, कोरडी आणि गडद होऊ शकते. जर तुम्हाला तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवायची असेल, तर व्हिटॅमिन बी 12 साठी आहारात अंडी, दूध, दही, पनीर, चिकन, मासे, फोर्टिफाइड धान्य यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.
advertisement
पुरेशी झोप घेणं आवश्यक
व्हिटॅमिन डी साठी आहारात मशरूम, अंड्याचा पिवळा भाग, फोर्टिफाइड दूध आणि धान्य, सॅल्मन, टूना सारखे फॅटी फिश यांचा समावेश करा. तसेच, दिवसातून कमीतकमी 15-20 मिनिटे हलका सूर्यप्रकाश घ्या. याशिवाय, भरपूर पाणी प्या जेणेकरून त्वचा हायड्रेटेड राहील आणि जंक फूड आणि साखरयुक्त पदार्थांपासून दूर राहा. 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणेही महत्त्वाचं आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
'या' व्हिटॅमिन्सची कमतरतेमुळे त्वचा होते डार्क, आहारात करा 'हा' मुख्य बदल, चेहऱ्यावर येईल नवं तेज
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement