1) दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर : एका अहवालानुसार, दम्याच्या रुग्णांसाठी किवी खाणं फायद्याचं ठरतं. किवीत असलेलं व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स दम्याची लक्षणे आणि त्रास कमी करायला मदत करतात.
advertisement
2) हृदयाचं आरोग्य सुधारतं : किवीचे सेवन केल्याने एचडीएल म्हणजेच चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतं. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहायला मदत होते. याशिवाय वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सही कमी झाल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची भीती कमी होते.
3) आतड्यांच्या आरोग्यासाठी वरदान : किवी हे फळ बहुगुणी जरी असलं तरीही ते आतड्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. किवीमध्ये असलेल्या अॅक्टिनिडिन एंझाइम्स प्रोटिन्स तोडून अन्न लवकर पचायला मदत करतात. किवीत भरपूर प्रमाणात फायबर्स आढळून येतात. ज्यामुळे पचनशक्ती सुधारते. याशिवाय गॅसेस, अपचन आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
4) रोगप्रतिकारक शक्ती वाढते: किवीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि फोलेट तसेच कॅरोटीनॉइड्स, फायबर आणि पॉलिसेकेराइड्स असतात. हे सगळे घटक आपल्या शरीराचं मुक्त रॅडिकल्सपासून रक्षण करतात. त्यामुळे शरीराला असलेल्या संभाव्य संक्रमणांचा धोका टळतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
5) जुनाट आजारांचा धोका कमी होतो : किवीमध्ये अनेक प्रकारचे फायटोकेमिकल्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. अँटीऑक्सिडंट्स पेशींमधून मुक्त रॅडिकल्स काढून टाकून ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. मधुमेह, यकृत रोग, हृदयरोग, लठ्ठपणा इत्यादी अनेक जुनाट आजारांसाठी ऑक्सिडेटिव्ह ताण जबाबदार आहे. अशा परिस्थितीत, किवीचे सेवन केल्याने या आजारांचा गंभीर आजारांचा धोका टाळता येतो.
6) डोळ्यांसाठी फायदेशीर : किवीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आढळून येतं. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. किवीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन मुबलक प्रमाणात मिळते. ज्यामुळे रेटीनाचं आरोग्य सुधारून दृष्टीदोष कमी व्हायला मदत होते.