TRENDING:

Pimples : मुरुमं, डागांवर सोपा आणि सहज उपाय, वाचा खास स्किन केअर टिप्स, तेलकट चेहरा दिसेल टवटवीत

Last Updated:

केमिकलयुक्त फेसवॉशनं त्वचेचं आणखी नुकसान होचवू शकतं. त्वचा तेलकट असेल तर सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी नैसर्गिक फेसवॉश वापरा. ​​यामुळे त्वचा स्वच्छ राहील आणि पिंपल्सचा धोका कमी होईल. चेहरा चांगला दिसावा यासाठी इथे दिलेले पर्याय तुमची त्वचा चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिवाळ्यात त्वचा कोरडी होते, काहींना चेहऱ्यावर पिंपल्स येतात, त्याचे काळे डाग चेहऱ्यावर राहतात. हे बहुतेकदा घाण, धूळ आणि त्वचेवर जास्त तेल साचल्यामुळे मुरुम येतात. म्हणून, दररोज चेहरा स्वच्छ ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. दिवसातून कमीत कमी दोनदा सौम्य फेस वॉशनं चेहरा धुवा.
News18
News18
advertisement

केमिकलयुक्त फेसवॉशनं त्वचेचं आणखी नुकसान होचवू शकतं. त्वचा तेलकट असेल तर सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी नैसर्गिक फेसवॉश वापरा. ​​यामुळे त्वचा स्वच्छ राहील आणि पिंपल्सचा धोका कमी होईल. चेहरा चांगला दिसावा यासाठी इथे दिलेले पर्याय तुमची त्वचा चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत.

Vitamin B12 : ठणठणीत प्रकृतीसाठी व्हिटॅमिन बी 12 का गरजेचं, जाणून घ्या सविस्तर

advertisement

कडुनिंब आणि हळदीत नैसर्गिकरित्या बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करणारे आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. मुरुम आणि काळे डाग कमी करण्यासाठी हे दोन्ही घटक खूप उपयुक्त आहेत. कडुनिंबाच्या पानांची पेस्ट बनवा आणि ती चेहऱ्यावर लावा आणि पंधरा-वीस मिनिटांनी धुवा.

हळद आणि दूध मिसळा आणि चेहऱ्याला लावा. पंधरा मिनिटांनी कोमट पाण्यानं धुवा. या दोन्ही उपायांमुळे त्वचा स्वच्छ राहते.

advertisement

पाणी पिणं शरीरासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील आवश्यक आहे. दररोज आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. पाणी पिण्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे मुरुमं आणि डाग कमी होतात आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

आपण जे खातो त्याचा त्वचेवर थेट परिणाम होतो. जंक फूड आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यानं मुरुमांचा धोका वाढू शकतो. ताजी फळं, हिरव्या भाज्या आणि व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असलेले पदार्थ त्वचेसाठी उत्तम आहेत. निरोगी आहारामुळे मुरुमं कमी होतातच तसंच त्वचेला चमक देखील मिळते.

advertisement

Breakfast : न्याहारी करणं का महत्त्वाचं ? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

मुरुम आणि काळे डाग दूर करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे घरी फेस मास्क बनवणं आणि त्वचा एक्सफोलिएट करणं. ओटमील, दही आणि मध मिसळून फेस मास्क बनवून चेहऱ्याला लावा आणि पंधरा-वीस मिनिटांनी धुवा.

धुतल्यानंतर चेहऱ्यावर हलक्या हातानं मसाज करा. जेणेकरून त्वचेच्या मृत पेशी निघून जातील आणि त्वचा ताजी होईल. आठवड्यातून दोन-तीन वेळा असं केल्यानं त्वचा स्वच्छ, निरोगी आणि चमकदार राहील.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात आज इतका पाऊस का पडला? नेमकं काय कारण? हवामान शास्त्रज्ञांनी स्पष्टच सांगितलं, Video
सर्व पहा

कोणतंही वेगळं उत्पादन वापरल्यानं चेहऱ्यावर एलर्जी येत असेल तर पॅच टेस्ट करायला विसरु नका.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pimples : मुरुमं, डागांवर सोपा आणि सहज उपाय, वाचा खास स्किन केअर टिप्स, तेलकट चेहरा दिसेल टवटवीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल