TRENDING:

Weight Loss : फिटनेस इन्फ्लुएंसरने फक्त 30 दिवसांत केलं वजन कमी, वेट लॉससाठी सांगितल्या 6 सुपर इफेक्टिव्ह टिप्स

Last Updated:

वजन कमी करणे हे अनेक लोकांसाठी एक मोठे आव्हान असते, पण योग्य आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैली असल्यास हे लक्ष्य सहज साध्य करता येते. एका महिलेने तिचा अनुभव सांगताना, केवळ एका महिन्यात 4 किलो वजन कसे कमी केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Use These Tips To Lose Weight In A Month : वजन कमी करणे हे अनेक लोकांसाठी एक मोठे आव्हान असते, पण योग्य आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैली असल्यास हे लक्ष्य सहज साध्य करता येते. एका महिलेने तिचा अनुभव सांगताना, केवळ एका महिन्यात 4 किलो वजन कसे कमी केले, याच्या 6 सोप्या स्टेप्स उघड केल्या आहेत. या टिप्स फॉलो करून तुम्हीही तुमच्या फिटनेसच्या प्रवासाला सुरुवात करू शकता. बुलबुल ठक्कर हिने तिचा इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने 6 सोप्या स्टेप्स वापरून वजन कस कमी करायचं हे सांगितलं आहे.
News18
News18
advertisement

एकावेळी एकच सवय

तिने तिच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर व्हिडिओ शेअर करत सांगितलं आहे की, प्रत्येक गोष्ट एकत्र करायचा प्रयत्न करू नका त्यामुळे तुमच्या शरीरावर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि शरीर शॉक स्टेटमध्ये जाऊ शकते. त्या ऐवजी, प्रत्येक आठवड्याला एक सवय अंगीकारा जेणेकरून तुमचं शरीर गोष्टी उत्तमरित्या स्वीकारू शकेल.

वर्कआउट प्लॅन बनवा आणि त्यालाच फॉलो करा

तुमच्या वजनानुसार वर्कआउट प्लॅन करा. आठवड्यातून प्रत्येक दिवशी तुम्ही काय वर्कआउट करणार हे ठरवा आणि त्याच प्लॅनला दररोज फॉलो करा. जेणेकरून तुमचं शरीर थकणार नाही आणि तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात तुम्हाला गती मिळेल.

advertisement

कॅलरीज काउंट करा

बुलबुल ठक्कर यांच्या मते, तुम्ही किती कॅलरीज घेता यावर तुमचं वजन ठरत. वजन कमी करायच्या प्रवासात हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. सध्या अनेक फ्री कॅलरी काउंट ॲप प्लेस्टोर किंवा मोबाईल मध्ये उपलब्ध असतात त्यात तुम्ही तुमच्या वजनाच्या हिशोबाने तुमच्या शरीराला किती कॅलरीज गरजेच्या आहेत हे माहिती करून घेऊ शकता.

advertisement

गरजेनुसारच कॅलरीज आणि प्रोटीन घ्या

कॅलरीज काउंट केल्यानंतर दररोज गरजेनुसार कॅलरीज घ्या, सोबतच प्रोटीनचीही शरीराला गरज असते. त्यामुळे प्रोटीनचेही योग्य प्रमाणात शरीरात इनटेक असावे.

बाहेरच खायची इच्छा झाली तर काय करावं?

अनेकदा जेव्हा जेव्हा आपण वजन कमी करायचा विचार करतो तेव्हा तेव्हा आपल्याला बाहेरच किंवा जंक फूड खायची इच्छा वाढते, अशा वेळेस आपण कधीकधी चिट डे म्हणून बाहेरच काही खातो. पण बुलबुल यांच्या मते जेव्हा केव्हा आपल्याला बाहेरच काही खाण्याची इच्छा होते तेव्हा पाणी प्यावे, याने शरीरात योग्य तेवढं पाणी जाईल आणि तुमची खायची इच्छा कमी होईल.

advertisement

30 मिनिटं कार्डिओ वर्कआउट करा

बुलबुल यांनी व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, जेव्हा वजन कमी करायचे असते तेव्हा कार्डिओ वर्कआउट कारण किती महत्वाचं आहे. त्यांच्या मते, तुमच्या दररोजच्या व्यायामात 30 मिनिटं कार्डिओ वर्क आउटचा समावेश करा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight Loss : फिटनेस इन्फ्लुएंसरने फक्त 30 दिवसांत केलं वजन कमी, वेट लॉससाठी सांगितल्या 6 सुपर इफेक्टिव्ह टिप्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल