Solapur News: 32 वर्षांपूर्वीची ‘ती’ काळरात्र आठवली की आजही होतो थरकाप, अख्खं गाव ओस पडलं, सोलापुरात नेमकं काय घडलं? Video
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Solapur News: रात्री अचानक घडलेल्या घटनेने अर्जुनसोंडमधील गावकरी घाबरले होते. त्यात घराला तडे जाऊन नुकसान झालं होतं. त्यामुळे गावकऱ्यांनी भीतीने गाव सोडण्याचा निर्णय घेतला.
सोलापूर: गेल्या कित्येक वर्षानंतर आलेल्या महापुरात सोलापुरात हाहाकार माजवला. सीना नदीकाठची काही गावे पाण्यात गेली. अशीच प्रलयकारी घटना आजपासून 32 वर्षांपूर्वी सोलापुरातील एका गावात घडली होती. 30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारीचा महाप्रलयकारी भूकंप झाला होता. तेव्हा मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड गावाला देखील मोठे हादरे बसले होते. रात्री अचानक बसलेल्या हादऱ्यांच्या आठवणीने आजही गावकऱ्यांना धडकी भरते. त्यानंतर अख्खे गाव रिकामे झाले असून गावात कुणीही राहत नाही. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
किल्लारीच्या महाप्रलयकारी भूकंपाला 30 सप्टेंबर 2025 रोजी 32 वर्षे पूर्ण होत आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांनी संपूर्ण देश सुन्न झाला होता. या भूकंपाचा 11 जिल्ह्यांना फटका बसला होता. याच दिवशी सोलापुरातील अर्जुनसोंड गावात देखील भूकंपाचे हादरे बसले होते. गावकरी साखरझोपेत असतानाच मोठा आवाज झाला आणि घरात हादरे जाणवू लागले. अचानक थरकाप उडवणाऱ्या आवाजाने झोप उडाली आणि गावकरी घराबाहेर पडले. संपूर्ण गाव जागा झाला होता आणि काय घडतंय हे समजत नव्हते, असे गावकरी सांगतात.
advertisement
घराबाहेर पळ काढला
या भूकंपाबाबत अर्जुनसोंडमधील मच्छिंद्र वाघमारे सांगतात की, साखर झोपेत असताना मोठा आवाज झाला आणि हादरे जाणवू लागले. तेव्हा लहान लेकरं घेऊन घराबाहेर पळ काढला. घरांच्या भिंतीवर जणू विमान येऊन धडकले की काय असा भयानक आवाज येत होता. मातीची घरे ढासळत होती, गावातील कित्येक ग्रामस्थ या भूकंपामध्ये जखमी झाले होते.
advertisement
दरम्यान, रात्री अचानक घडलेल्या या घटनेने अर्जुनसोंडमधील गावकरी घाबरले होते. त्यात घराला तडे जाऊन नुकसान झाले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी भीतीने गाव सोडण्याचा निर्णय घेतला. गावापासून काही अंतरावर असणाऱ्या दोन माळांवर गाव स्थलांतरित झाले. आता या गावात मारुतीचे मंदिर आणि पडलेली घरे आणि भूकंपाच्या आठवणी आहेत. तर गावकरी तीन वेगवेगळ्या ठिकाणी राहिले आहेत.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Sep 30, 2025 10:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur News: 32 वर्षांपूर्वीची ‘ती’ काळरात्र आठवली की आजही होतो थरकाप, अख्खं गाव ओस पडलं, सोलापुरात नेमकं काय घडलं? Video






