किल्लारीच्या महाप्रलयकारी भूकंपाला 30 सप्टेंबर 2025 रोजी 32 वर्षे पूर्ण होत आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांनी संपूर्ण देश सुन्न झाला होता. या भूकंपाचा 11 जिल्ह्यांना फटका बसला होता. याच दिवशी सोलापुरातील अर्जुनसोंड गावात देखील भूकंपाचे हादरे बसले होते. गावकरी साखरझोपेत असतानाच मोठा आवाज झाला आणि घरात हादरे जाणवू लागले. अचानक थरकाप उडवणाऱ्या आवाजाने झोप उडाली आणि गावकरी घराबाहेर पडले. संपूर्ण गाव जागा झाला होता आणि काय घडतंय हे समजत नव्हते, असे गावकरी सांगतात.
advertisement
सीना नदीचं गावकऱ्यांनी पहिलं पहिल्यांदाच रौद्ररूप; अख्खा गाव झाला रिकामा
घराबाहेर पळ काढला
या भूकंपाबाबत अर्जुनसोंडमधील मच्छिंद्र वाघमारे सांगतात की, साखर झोपेत असताना मोठा आवाज झाला आणि हादरे जाणवू लागले. तेव्हा लहान लेकरं घेऊन घराबाहेर पळ काढला. घरांच्या भिंतीवर जणू विमान येऊन धडकले की काय असा भयानक आवाज येत होता. मातीची घरे ढासळत होती, गावातील कित्येक ग्रामस्थ या भूकंपामध्ये जखमी झाले होते.
दरम्यान, रात्री अचानक घडलेल्या या घटनेने अर्जुनसोंडमधील गावकरी घाबरले होते. त्यात घराला तडे जाऊन नुकसान झाले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी भीतीने गाव सोडण्याचा निर्णय घेतला. गावापासून काही अंतरावर असणाऱ्या दोन माळांवर गाव स्थलांतरित झाले. आता या गावात मारुतीचे मंदिर आणि पडलेली घरे आणि भूकंपाच्या आठवणी आहेत. तर गावकरी तीन वेगवेगळ्या ठिकाणी राहिले आहेत.