चेहऱ्यावरच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी नैसर्गिक आणि घरगुती उपचार हे सर्वात सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं सिद्ध झाले आहे. मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी आणि चेहरा उजळवण्यासाठी पाच प्रभावी फेस पॅक पाहूया.
कॉफी आणि नारळ तेल एक्सफोलिएटिंग पॅक - एक टेबलस्पून बारीक दळलेली कॉफी, एक टीस्पून नारळ तेल हे दोन्ही घटक एकत्र करून जाडसर पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि पाच-सात मिनिटं हलक्या हातानं मसाज करा. आणखी दहा मिनिटं तसंच राहू द्या, नंतर पाण्यानं धुवा. कॉफी बीन्स एक नैसर्गिक आणि प्रभावी स्क्रब म्हणून काम करतात, मृत पेशी काढून टाकतात आणि रक्ताभिसरण वाढवतात. नारळाचं तेल त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करतं आणि मऊ करतं. हा पॅक त्वचेला ताजी चमक देण्यास मदत करतो.
advertisement
Drumsticks : शेवग्याच्या शेंगांचं सूप प्या, ठणठणीत राहा, वाचा सविस्तर
ओट्स आणि हनी स्क्रब पॅक - हा पॅक बनवण्यासाठी, दोन चमचे ओट्स, एक चमचा मध, गुलाब पाणी असं साहित्य लागेल. ओट्स थोडेसे ओले करा आणि मधात मिसळा. जाड पेस्ट बनवण्यासाठी थोडं गुलाब पाणी घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि दहा-पंधरा मिनिटं सुकू द्या. नंतर, ओल्या हातांनी हळूवारपणे स्क्रब करा आणि धुवा. ओटमील हे एक सौम्य स्क्रब आहे, मृत पेशी यामुळे सहजपणे काढून टाकल्या जातात आणि छिद्रं मोकळी होतात. मध हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आणि अँटीबॅक्टेरियल एजंट आहे.
बेसन आणि दही पॅक - हा पॅक बनवण्यासाठी दोन चमचे बेसन, एक चमचा दही, अर्धा चमचा मध. हे सर्व घटक एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि सुकू द्या. सुकल्यानंतर, गोलाकारपणे घासून घ्या आणि नंतर थंड पाण्यानं धुवा.
यातलं बेसन हे नैसर्गिक क्लींजर आणि एक्सफोलिएटर म्हणून काम करतं, यामुळे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकायला मदत होते. दह्यात लॅक्टिक एसिड असतं, ज्यामुळे त्वचा मऊ होते आणि सौम्य एक्सफोलिएशन करण्यास मदत करते. मधामुळे ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते. हा पॅक त्वचेला खोलवर स्वच्छ करतो आणि यामुळे त्वचा चमकदार होते.
Baking Soda :खाण्याबरोबरच त्वचेसाठीही उपयुक्त, जाणून घ्या बेकिंग सोड्याचे उपयोग
पपई आणि मध पॅक - पिकलेली पपई दोन चमचे, मध अर्धा चमचा. पपई कुस्करा आणि त्यात मध मिसळा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि पंधरा-वीस मिनिटांनी थंड पाण्यानं धुवा. पपई हे एक नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे. यामुळे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्या जातात आणि त्वचा मऊ होते. मधामुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि पोषण मिळतं. ह्या पॅकमुळे त्वचा उजळ होते.
संत्र्याच्या सालीचा आणि दुधाचा पॅक - एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर, एक चमचा कच्चं दूध,दोन्ही घटक एकत्र करून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावा आणि पंधरा-वीस मिनिटं सुकू द्या आणि नंतर हलक्या हातानं घासून धुवा. संत्र्याच्या सालींतील सायट्रिक अॅसिड मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास आणि त्वचेला उजळ करण्यास मदत करते. दुधात लॅक्टिक अॅसिड त्वचेला एक्सफोलिएट करतं आणि मॉइश्चरायझ करतं. हा पॅक त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
