TRENDING:

25 वर्षांपासून प्रसिद्ध डोंबिवलीतील वडापाव, जपलीय तीच चव, खवय्यांची असते मोठी गर्दी

Last Updated:

डोंबिवलीमध्ये खूप वडापाव लव्हर्स आहेत आणि त्यांच्यासाठी खूप प्रसिद्ध असे वडापावचे स्पॉट सुद्धा. डोंबिवलीतील चंदू वडापाव गेले 25 वर्ष डोंबिवलीत खूप प्रसिद्ध आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी 
advertisement

डोंबिवली : डोंबिवली म्हणजे वडापावची नगरी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. डोंबिवलीमध्ये खूप वडापाव लव्हर्स आहेत आणि त्यांच्यासाठी खूप प्रसिद्ध असे वडापावचे स्पॉट सुद्धा. डोंबिवलीतील चंदू वडापाव गेले 25 वर्ष डोंबिवलीत खूप प्रसिद्ध आहे. मोजक्या पाच प्रसिद्ध वडापावमध्ये या चंदू वडापावचे नाव आवर्जून घेतलं जातं. यांचा वडापाव फक्त 15 रुपये असून आजही अनेक जुने डोंबिवलीकर आवर्जून इथे वडापाव खाण्यासाठी येतात.

advertisement

चंद्रकांत म्हात्रे यांनी हा व्यवसाय 1997 ला सुरू केला. सुरुवातीला काका आणि त्यांच्या बहिणी मिळून हा व्यवसाय चालवायचे तेव्हा भाज्या, चपात्या असं सगळं ते विकायचे पण नंतर बहिणींची लग्न झाल्यानंतर काकांनी फक्त वडापाव विकण्यास सुरुवात केली. त्यांच्या इथला वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या इथे मिळणारी हिरवी, चटणी आणि त्यासोबत कांदा, कोबी आणि बरंच काही. बटाट्याची भाजी तर उत्तम लागते आणि त्यामुळे त्यांच्या वडापावला अधिक चव आहे.

advertisement

डोंबिवलीतल्या टॉप फाय वडापावमध्ये हमखास चंदू वडापावच नाव घेतलं. काकांचा स्वभाव बोलका असल्यामुळे गेली 25 वर्ष जुने गिऱ्हाईक आजही सातत्याने इथे येत असतात. अगदी दुकानाच्या सुरुवातीला 2 रुपयात वडापाव ठेवण्यात आला होता. आजही कोणी 10 रुपये घेऊन जरी आला तरीही काका त्याला खाल्ल्याशिवाय पाठवत नाहीत.

advertisement

कॉलेजच्या आणि शाळेच्या मुलांसाठी तर हा काकांचा वडापाव बजेटमध्ये बसणारी आणि चविष्ट अशी गोष्ट आहे. त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या अनेक शाळा आणि कॉलेजातील मुले पिझ्झा आणि बर्गर च्या या जमान्यात आवडीने वडापाव खायला येतात. यामध्ये चंदू वडापावची चव तर आहेत पण त्यासोबतच आपुलकी आणि प्रेम सुद्धा आहे. इथे तुम्हाला 15 रुपयाचा वडापाव, त्याच सोबत समोसा, बटाटा भजी आणि चहा हे सगळं मिळेल. इथला चहा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.

advertisement

पुण्यात मिळतेय अस्सल कोकणी पदार्थांची मेजवानी, 93 वर्ष जुन्या बोर्डिंग हाऊसला खवय्यांची पसंती

'मी हा व्यवसाय 100 रुपयांना सुरू केला होता. तेव्हा असा काही अंदाज नव्हता की इतका प्रसिद्ध होईल. गिऱ्हाईक म्हणजे सर्वकाही याच उद्देशाने मी व्यवसाय चालवत आलोय. शाळा आणि कॉलेजातील मुले तर आवर्जून रोज वडापाव खायला येतात' असे चंद्रकांत म्हात्रे यांनी सांगितले.

मग मंडळी तुम्हाला सुद्धा डोंबिवलीतला टॉप फाय मध्ये येणारा चंदू वडापाव ट्राय करायचा असेल तर आवर्जून डोंबिवली स्थानकांपासून 20 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या सुनील नगर येथील चंदू वडापावला भेट द्या. आणि आज चटपटीत आणि चविष्ट वडापाव खा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
25 वर्षांपासून प्रसिद्ध डोंबिवलीतील वडापाव, जपलीय तीच चव, खवय्यांची असते मोठी गर्दी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल