कल्याण: सध्याच्या काळात अनेक तरुण हे व्यवसायाकडे वळत आहेत. विशेषत: खाद्यपदार्थांच्या व्यवसायाकडे अनेकांचा कल आहे. कल्याणमधील एका इंजिनियर तरुणानं स्वत:चा वडापाव विक्रीचा स्टॉल सुरू केलाय. ‘इंजिनियर वडेवाले’ या नावाने सुरू केलेल्या या व्यवसायाला खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे कल्याणमधील घनश्याम सानप या आयटी इंजिनियर तरुणाची एका दिवसाची कमाई 3 ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत आहे.
advertisement
कल्याणच्या घनश्याम सानप या तरुणाने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. इंजिनियरिंग केल्यानंतर पुन्हा एमबीए देखील पूर्ण केले. कॉलेजच्या दिवसांमध्ये पुण्यात असताना घनश्याम व त्याच्या मित्राने खाद्यपदार्थ्यांचा स्वतःचा वेगळा ब्रँड सुरु करण्याचा विचार केला होता. त्यानुसार कल्याणध्ये गेल्यानंतर घनश्यामने ‘इंजिनियर वडेवाले’ नावाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्याला कुटुंबीयांची देखील साथ लाभली. विशेष म्हणजे घनश्याम सध्या एका आयटी कंपनीमध्ये एचआर म्हणून कार्यरत आहे. तर त्याच्या या व्यवसायात वडील मदत करतात.
ब्राऊनी लव्हरसाठी बेस्ट ऑप्शन, डोंबिवलीत एकाच ठिकाणी खा 6 हून अधिक प्रकार, किंमतही स्वस्त
इंजिनियर वडेवालेमध्ये वडापाव, पाव वडा, कडी समोसा, समोसा, पॅटीस हे सगळे पदार्थ मिळतात. इथल्या वडापावची किंमत फक्त 15 रुपये आहे. त्यामुळे अनेक जण हमखास इथे वडापाव खाण्यासाठी येतात. इथे मिळणारा कढी समोसा सुद्धा सर्वांना खूप आवडतो. इथली स्पेशल मिसळ थाळी देखील प्रसिद्ध आहे. या स्पेशल मिसळ थाळीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला मिसळ पाव तर मिळतीलच पण त्यासोबतच एक वाटी दही, कांदा टोमॅटो लिंबू, आणि एक पापड असं सगळं मिळेल. जेणेकरून आपलं जेवण झाल्याचंच फील तुम्हाला येईल. इथे मिळणारी टिफिन थाळी सुद्धा घरच्या जेवणासारखा फील देते. तिची किंमत फक्त 90 रुपये आहे. तुम्हाला जर बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी हवी असेल तर ती तुम्हाला इथे 20 रुपयांना मिळते.
प्लॅनिंग करून सुरू केला व्यवसाय
“इंजीनियरिंग झाल्यानंतर मी एमबीएला पुण्यात ऍडमिशन घेतलं. त्यावेळेसच माझा आणि माझ्या मित्राचा असा ब्रँड खोलण्याचा विचार सुरू झाला. आता मी प्रॉपर प्लॅनिंग करून स्वतःचा फूड बिजनेस सुरू केला आहे. माझ्या घरच्यांची मला यात खूप चांगली साथ लाभली आहे,” असे घनश्याम सानप यांनी सांगितले.
दरम्यान, इंजिनियर वडेवाले हे दुकान कल्याण स्थानकापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर बेतुरकर पाडा येथे आहे.