TRENDING:

संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे 'ही' कुरकुरीत जिलेबी, पाहूनच आवरणार नाही मोह

Last Updated:

महाराष्ट्रातील फेमस मिठाईवाल्याकडून प्रसादासाठी पदार्थ खरेदी करा. येथील जिलेबीला तर मोठी मागणी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक, 20 सप्टेंबर: यंदाच्या गणेशोत्सवात काहीतरी गोडधोड तर नक्कीच व्हायला हवं. तसा सर्वांचाच प्रयत्न असतो. घरात अनेकजण नैवेद्य बनवतातच. पण बाप्पाच्या प्रसादासाठी लागणारे पेढ्यांचे मोदक तसेच इतर मिठाई मिठाईच्या दुकानातून आणली जाते. नाशिकमध्ये 67 वर्षांची परंपरा असणारे बुधा हलवाई हे मिठाईचे दुकान आहे. येथील कुरकुरीत जिलेबी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. गणेशोत्सव काळात येथील जिलेबी आणि इतर मिठाईला मोठी मागणी असते.
advertisement

नाशिक शहरातील भद्रकाली मंदिर परिसरात 67 वर्ष जुने बुधा हलवाई मिठाई व जिलेबीवाले दुकान आहे. आजही या ठिकाणी विविध प्रकारच्या मिठाई आणि नाश्त्याचे प्रकार ते विकत आहेत. 1956 साली सुरू करण्यात आलेले हे बुधा हलवाई मिठाईचे दुकान सर्वप्रथम जलेबी विकत होते. खवय्यांची वाढती मागणी लक्षात घेता अनेक विविध प्रकारची मिठाई ठिकाणी विक्रीस ठेवण्यास सुरुवात केली. या सुप्रसिद्ध बुधा हलवाई दुकानाचे संस्थापक दिवंगत बुद्धा लक्ष्मण वाघ यांच्या हाताची चव अनेकांना आवडू लागल्याने या ठिकाणी मोठी गर्दी जमू लागली. 67 वर्षांपासून एकच चव खवय्यांना देत फक्त नाशिककरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात बुधा हलवाईच्या पेढ्यांनी प्रसिद्धी मिळवली आहे.

advertisement

फक्त गव्हाच्या पिठापासून बनवा बाप्पासाठी नैवेद्य, 5 मिनिटात तयार होईल पदार्थ

या ठिकाणी मिळणाऱ्या मिठाईचे वैशिष्ट्य

नाशिकच्या या सुप्रसिद्ध बुधा हलवाई या ठिकाणी सणावाराला मिठाई खरेदी करण्यासाठी खवय्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याचप्रमाणे येथे मिळणारे स्वादिष्ट पेढे आणि श्रीखंड खवय्ये आवडीने खरेदी करतात. अगदी मिठाईच नव्हे तर या ठिकाणी मिळणाऱ्या जिलेबी, फाफडा, ढोकळा आणि कचोरी खाण्यासाठी लोक सकाळीच गर्दी करतात. जलेबी व इतर नाश्ता प्रकाराची किंमत 20 रुपयांपासून सुरू होते. तसे नाश्त्यासाठी हे ठिकाण अगदी पॉकेट फ्रेंडली असल्यामुळे नाशिककरांची बुधा हलवाईला अधिक मागणी आहे, अशी माहिती व्यवस्थापक राजू यादव यांनी दिली.

advertisement

उपवासाची जिलेबी

बुधाजी वाघ यांनी 1956 साली या बुधा हलवाई जिलेबी दुकानाची स्थापना केली आहे. तेव्हापासून आजतागायत हे जिलेबी दुकान खवय्यांसाठी खुले आहे. दररोज शेकडो ग्राहक दुकानात येत असतात. सण उत्सव काळात दुकानात पाय ठेवायला देखील जागा नसते. विशेष म्हणजे आषाढी एकादशी आणि महाशिवरात्रीला या दुकानात स्पेशल उपवासाची जिलेबी मिळते. उपवासाची जिलेबी ही बटाट्यांपासून बनवलेली असते. त्यालाही ग्राहकांची मोठी पसंती असते.

advertisement

35 फूट खोल जमिनीत आहे हे गणेश मंदिर, 12 वर्षांनी अवतरते गंगा

कशी बनवली जाते बुधा हलवाई जिलेबी ?

एक दिवस अगोदर मैदा भिजवला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वनस्पती तुपात जिलेबी काढली जाते. साखरेच्या पाकात टाकण्याच्या अगोदर पाकात, जायफळ आणि केशरच मिश्रण केलं जातं. त्यानंतर पाकात टाकून जिलेबी काढली जाते. त्यानंतर ग्राहकांना दिली जाते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे 'ही' कुरकुरीत जिलेबी, पाहूनच आवरणार नाही मोह
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल