एक मोदक करण्यासाठी 15 सेकंद इतका कालावधी लागतो.हे मोदक पूर्ण पणे हाताने तयार केले जातात. त्यासाठी दिवसाला दोन ते अडीच हजार नारळ लागतात. मोदकासाठी आंबे मोहरचा तांदूळ वापरण्यात येतो.
बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे? पाहा सोपी रेसिपी
नारळ चांगल्या पद्धतीनं खोवून त्यामध्ये गूळ आणि जायफळ टाकला जातो, हे मिश्रण पूर्णपणे एकजीव केले जाते. त्यानंतर पिठाची उकड 15 ते 20 मिनिटं घेतली जाते.
advertisement
पौष्टीक नाचणी सत्वाच्या मोदकाचा बाप्पाला दाखवा नैवेद्य, पाहा सोपी रेसिपी
हातानं पीठ मळून त्याचे गोळे तयार केले जातात. या गोळ्यात सारण घालून मोदक बनवतात.सुंदर सुबक आणि खायला देखील तितकाच स्वादिष्ट असा हा मोदकाचा प्रकार आहे. याची खरेदी तुम्ही ऑनलाईन फूड पोर्टलच्या माध्यमातूनही करू शकतात. पुण्यासह मुंबईतील ग्राहकांचाही याला चांगला प्रतिसाद आहे, अशी माहिती मेढी यांनी दिली.