TRENDING:

Dal Funke Recipe : तेलकट भजी नको, बनवा बिनतेलाचे फुनके; थंडीसाठी पौष्टिक पण भन्नाट रेसिपी

Last Updated:

Dal Funke Recipe Video : तेल न वापरता बनवलेली हाय प्रोटिन रेसिपी. हिवाळ्यात कढी आणि फुनके हे कॉम्बिनेशन ट्राय करायलाच हवं. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
थंडी म्हटलं की गरमागरम भजी... पण भजी म्हणजे तेलकट त्यामुळे अनेकांना ती नकोशी वाटतं. पण काहीतरी गरमागरम चमचमीत खायचं आहे, तर मग ही रेसिपी खास तुमच्यासाठी, फुनके. बिलकुल ते  न वापरता बनवलेली डिश. थंडीसाठी पौष्टीक आणि प्रोटिनयुक्त असा हा पदार्थ. जो तुम्ही एकदा तरी ट्राय करायला हवा.
News18
News18
advertisement

फुनके... काही जणांसाठी हे नाव परिचित असेल, तर काहींसाठी नवीन, ते पहिल्यांदाच ऐकत असतील. फुनके हा खान्देशातील प्रसिद्ध पदार्थ आहे. याला वाफोळे असंही म्हणतात कारण ते वाफवून करतात. आता यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ते कसं बनवायचं पाहुयात.

फुनके बनवण्यासाठी लागणारं साहित्य

2 वाट्या चणा डाळ

एक वाटी मूग डाळ

advertisement

एक कांदा

बारीक चिरलेली कोथिंबीर

2 इंच आलं

4-5 हिरव्या मिरच्या

3-4 लसूण पाकळ्या

Kadhi Recipe Video : मडक्यातील चिपीची कढी, कधी टेस्ट केलीये का? आजी पणजीची जुनी रेसिपी

अर्धा चमचा हळद

एक चमचा धणे पावडर

बडिशेप एक चमचा

जिरे एक चमचा

ओवा एक चमचा

हिंग

मीठ

फुनके कसे बनवायचे, कृती

advertisement

दोन्ही डाळी 5-6 तास पाण्यात भिजवून घ्या. त्या एकत्र जाडसर वाटून घ्या.  मिरची, आलं आणि लसूण यांची पेस्ट किंवा ठेचा करून घ्या. आता वाटलेल्या डाळीत अर्धा चमचा हळद, एक चमचा धणे पावडर, बडिशेप एक चमचा, जिरे एक चमचा, ओवा एक चमचा, थोडं हिंग, बारीक चिरलेला कांदा, मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ, कोथिंबीर सगळं नीट मिक्स करून घ्या.

advertisement

गॅसवर कढई ठेवा. त्याच्या आता स्टीलची रिंग ठेवा आणि पाणी ओता. रिंगवर चाळणी ठेवा आणि डाळीचं मिश्रण मुठीत घेऊन वळा आणि तसेच चाळणीत ठेवा. आता कढईवर झाकण ठेवून 15-20 मिनिटं वाफवून घ्या. वाफवण्याची ही प्रक्रिया तुम्ही स्टिमर, इडली पात्र किंवा कुकरमध्येही करू शकता.

Besan Recipe Video : नॉनव्हेजच्या चवीची भाजी, यासमोर चिकन-मटणही फेल

advertisement

आता यात सुरी टाकून बघा, सुरी काहीही न चिकटता स्वच्छ बाहेर आली तर फुनके चांगले शिजले आहेत. आता ते काढून घ्या. हे फुनके कढीसोबत खातात. हिवाळ्यात कढी आणि फुनके हे कॉम्बिनेशन ट्राय करायलाच हवं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कमी क्षेत्रात मिळेल जास्त उत्पादन, अशी करा 90 दिवसांत राजमा शेती, Video
सर्व पहा

Marathi Recipe युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुमच्याकडे याला आणखी काही म्हणत असतील तर आम्हाला नक्की सांगा. तुम्ही कधी हे खाल्लं आहे का? नाहीतर आता बनवून पाहा आणि कसे झाले आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन सांगा. तुमच्याकडेही अशी काही वेगळी, हटके, पारंपारिक, स्थानिक, जुनी, गावाकडची रेसिपी असेल तर त्याची रेसिपीही आम्हाला सांगायला विसरू नका.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Dal Funke Recipe : तेलकट भजी नको, बनवा बिनतेलाचे फुनके; थंडीसाठी पौष्टिक पण भन्नाट रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल