कुंजराची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
कुंजराची भाजी, कांदा (कांदे इतर भाजीपेक्षा जास्त घ्यावे लागतात), लाल मिरची, लसूण, जिरे, तेल, हळद आणि मीठ हे साहित्य लागेल.
Shravan Month 2025 : श्रावणात उपवास करताय? काय खावे आणि काय खाऊ नये? ही चूक तर तुम्ही करत नाही ना?
advertisement
कुंजराची भाजी बनवण्याची कृती
शेतातून आणलेली भाजी 1 ते 2 दिवस सुकवून घ्यायची आहे. त्यातील ओलसरपणा थोडा कमी झाला की, भाजी परफेक्ट तयार होते. तिला पाणी सुटत नाही. सुकल्यानंतर भाजी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे. कोरडी झाल्यानंतरच तिची भाजी करायला घ्यायची. भाजी कापून घेऊ नये.
त्यानंतर भाजी बनवताना सर्वात आधी कढईत तेल टाकून घ्यायचे. तेल थोडे गरम झाले की, त्यात जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे व्यवस्थित तळतळले की त्यात मिरची टाकून घ्यायची आहे. त्यानंतर लसूण टाकून घ्या. लसूण 2 मिनिटे शिजवून घेतल्यानंतर त्यात कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे.
कांदा लालसर झाल्यानंतर त्यात आता हळद आणि मीठ टाकून घ्या. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात कुंजराची भाजी टाकून घ्यायची आहे. भाजी त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करून झाल्यानंतर 5 मिनिटे ही भाजी शिजवून घ्यायची आहे.
5 मिनिटांनंतर भाजी तयार झाली असेल. ही भाजी खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागते. त्याबरोबर पौष्टिकही आहे. तुम्ही नक्की बनवून बघा पौष्टिक आणि टेस्टी अशी कुंजराची भाजी.