TRENDING:

Hyderabadi Biryani Recipe : हैदराबादी बिर्याणीची चव चिभेवर का रेंगाळते? 'या' खास मसाल्यांमध्ये दडलंय गुपित..

Last Updated:

Hyderabadi Biryani Special Ingredients : हैदराबादी दम बिर्याणीच्या चवीचं रहस्य हे काही खास मसाल्यांमध्ये दडलेलं आहे. या रेसिपीतील काही खास मसाले हैदराबादी बिर्याणीला एक वेगळी ओळख देतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हैदराबादी दम बिर्याणी हा देशभरातील मांसाहारी खवय्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. या बिर्याणीच्या चवीमुळं अनेकांना ती वारंवार खाण्याचा मोह आवरत नाही. तिच्या चवीचं रहस्य हे काही खास मसाल्यांमध्ये दडलेलं आहे. या रेसिपीतील काही खास मसाले हैदराबादी बिर्याणीला एक वेगळी ओळख देतात.
हैदराबादी बिर्याणीला खास बनवतात हे मसाले..
हैदराबादी बिर्याणीला खास बनवतात हे मसाले..
advertisement

या सर्व मसाल्यांचा योग्य प्रमाणात वापर बिर्याणीला सुगंधी आणि चविष्ट बनवण्यास मदत करतो. त्यासोबत कच्चं मांस मसाल्यांसोबत मॅरीनेट करून 'दम' देऊन शिजवण्याच्या पारंपारिक पद्धतीमुळे भाताच्या प्रत्येक कणात त्याची चव उतरते. यामुळेच हैदराबादी बिर्याणीची चव जिभेवर रेंगाळत असते.

देशभरातील खवय्ये हैदराबादी बिर्याणीला खाद्यांनांचा 'नवाब' म्हणतात. शहराच्या गल्लीबोळांपासून ते मोठ्या हॉटेल्सपर्यंत ही बिर्यानी बनते आणि खवय्यांची भूक भागवते. अनेकांना प्रश्न पडतो की या बिर्याणीची चव आणि सुगंध इतका खास का असतो? याचं उत्तर काही खास मसाले आहेत. वेलची, दालचिनी, लवंग, तमालपत्र आणि केशर यांसारखे शाही मसाले बिर्याणीला नवाबी थाट देतात. या सर्व मसल्यांचा वापर समजून घेऊ.

advertisement

हैदराबादी बिर्याणीला खास बनवतात हे मसाले..

शहाजिरे हे सामान्य जिऱ्यापेक्षा वेगळे आणि खास असतात. हे आकाराने पातळ आणि बारीक असतात आणि त्याचा सुगंधही तीव्र आणि वेगळा असतो. हैदराबादी दम बिर्याणीमध्ये शहाजिऱ्याचा वापर आवर्जून केला जातो. कारण ते पदार्थाला एक वेगळाच नवाबी सुगंध देतात. तूप किंवा तेलात हलके परतल्यानंतर त्याचा सुगंध संपूर्ण पदार्थात दरवळतो. यामुळे बिर्याणीची चव आणि सुगंध दोन्हीही बहारदार होतो.

advertisement

बिर्याणीची चव आणि सुगंध खास बनवण्यात हिरवी आणि मोठी वेलची महत्त्वाची भूमिका बजावतात. हिरवी वेलची गोड आणि ताज्या सुगंधासाठी ओळखली जाते, तर मोठ्या वेलचीची चव थोडी तीव्र आणि गडद असते. ती मांसासोबत मिळून एक 'स्मोकी' आणि रिच फ्लेवर तयार करते. दोन्ही वेलची एकत्र वापरल्यानंतर बिर्याणीचा दर्जा उंचावतो.

जावित्री आणि जायफळ हे दोन असे पदार्थ आहेत जे बिर्याणीला शाही टच देतात. यांचा वापर बिर्याणी अतिशय कमी प्रमाणात केला जातो, पण त्यांचा प्रभाव मात्र खूप मोठा असतो. जावित्रीचा हलका सुगंध आणि जायफळाची गडद चव मिळून बिर्याणीला एक वेगळा टच देतात. दे दोन्ही मसाले बिर्याणीला शाही दर्जा देतात. प्रामाण थोडं असली तरी ते बिर्याणीचा सुगंध अनेक पटींनी वाढवतात.

advertisement

दगडफूल हा एक खास आणि पारंपारिक मसाला असून त्याचा वापर दक्षिण भारतीय आणि हैदराबादी खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. बिर्याणीमध्ये याचा वापर कमी केला जातो, पण ते बिर्याणीला एक खास आणि पारंपारिक सुगंध देते. यामुले थोडा घरगुती टत देतात आणि हेच अस्सल हैदराबादी दम बिर्याणीचं वैशिष्ट्ये आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Hyderabadi Biryani Recipe : हैदराबादी बिर्याणीची चव चिभेवर का रेंगाळते? 'या' खास मसाल्यांमध्ये दडलंय गुपित..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल