TRENDING:

आता ठाण्यात खा चिकन कात्सू जापनीज पदार्थ; पाहा बनतो कसा Video

Last Updated:

ठाण्याच्या एका दुकानात चक्क चिकन कात्सू जापनीज पदार्थ मिळतोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे, 9 ऑक्टोबर: आजवर तुम्ही वेगवगेळ्या प्रकारच्या भारतीय नव्हे तर भारताबाहेरील देखील अनेक पदार्थांचा आस्वाद घेतला असेल. तसे आंतरराष्ट्रीय पदार्थांमध्ये चायनीज आणि इटालियन खाद्य संस्कृतीला भारतीय खवय्यांची विशिष्ट मागणी आहे. मात्र त्या व्यतिरिक्त देखील अनेक आंतरराष्ट्रीय पदार्थ आता भारतात मिळत आहेत. ठाण्याच्या अशाच एका दुकानात चक्क चिकन कात्सू जापनीज पदार्थ मिळतोय. विशेष म्हणजे कात्सू जापनीज पदार्थ खायला ठाणेकरांची मोठी पसंती मिळतेय.
advertisement

कुठे मिळत आहे पदार्थ?

ठाण्याच्या सिडको बस स्टॉप परिसरात असलेल्या कात्सूकट्टा नामक या दुकानात हा पदार्थ मिळत आहे. 23 वर्षीय तरुण रोहील अमित मोहिले हा कात्सू कट्ट्याचा मालक आहे.  हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्यानंतर त्याने येथे चिकन कात्सू जापनीज पदार्थ विकायला सुरुवात केली. हा चिकन कात्सू पदार्थ खाण्यासाठी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत लोक येथे गर्दी करतात.

advertisement

अरेबिक कुनाफा आता पुण्यात; एकाच ठिकाणी घ्या 10 प्रकारचा आस्वाद

कसा बनतो जापनीज कात्सू?

जापनीज चिकन कात्सू तयार करण्याची पद्धत ही अतिशय सोपी आहे. सर्वप्रथम चिकन मधील मांडीचा बोनलेस भाग घेतला जातो. त्याला भारतीय पद्धतीने अंड, हळद, मीठ, मिरची लावून मॅरीनेट केले जाते. त्या मॅरीनेटेड चिकनला ब्रेडक्रम्स चिटकवले जातात. जेणेकरून तळल्यास त्याला कुरकुरीतपणा येतो. त्या बोललेस चिकनचा पीसला तेलात तळून घेतले जाते. शेवटी क्रिस्पी कात्सूला लेटेस, कांदा आणि वेगवेगळे सॉसेस जसे की केचप, मेयोनीस, पेरी पेरी सॉस यासोबत खवय्यांना सर्व्ह केले जाते.

advertisement

आता बिनधास्त खावा शाकाहारी 'हॉट डॉग', युरोपियन डिश मिळतेय पुण्यात, Video

चिकन कात्सू चवीला क्रिस्पी त्याचबरोबर रसरशीत असा चविष्ट लागतो. या कात्सू पदार्थाला अगदी वयस्कर खवय्ये देखील चवीचवीने खातात. याची किंमत 100 ते 200 रुपये आहे अशी माहिती दुकानाचे मालक रोहील मोहिले यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
आता ठाण्यात खा चिकन कात्सू जापनीज पदार्थ; पाहा बनतो कसा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल