आता बिनधास्त खावा शाकाहारी 'हॉट डॉग', युरोपियन डिश मिळतेय पुण्यात, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
प्रसिद्ध युरोपियन डिश हॉट डॉग आता पुण्यात मिळत आहे. पनीर चीज सोबत मिळणारा हा पदार्थ नक्की ट्राय करा.
पुणे, 8 ऑक्टोबर: पुण्याची खाद्य संस्कृती ही जगात नावाजली जाते. इथे अनेक प्रकारचे पारंपरिक तसेच विदेशी पदार्थही खायला मिळतात. असाच एक पदार्थ म्हणजे पनीर चीझ हॉट डॉग होय. हे नाव ऐकून तुम्हालाही वेगळं वाटलं असेल. कारण हा पदार्थच मूळचा युरोपियन देश आणि अमेरिकेतील आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून हा पदार्थ पुण्यात मिळतो आहे.
पुण्यातील भोरी आळी सोन्या मारुती जवळ 'जय शंकर महाराज पावभाजी सेंटर' आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खाडिलकर दाम्पत्य हे सेंटर चालवत आहे. जगभरातील विविध पदार्थ ते आपल्या गाड्यावर विकत असतात. युरोप आणि अमेरिकेत प्रसिद्ध असणारा हॉट डॉग त्यांनी पुण्यात सुरू केला. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून हा पदार्थ पुणेकरांना चाखायला मिळतो आहे.
advertisement
कसा बनवतात हॉट डॉग?
सुरुवातीला आम्ही काही कॉलेज मध्ये पफ बर्गर पुरवत होतो. पण मग लॉकडाऊन नंतर गाडी सुरु केली. ही तवा पुलाव व पावभाजीची गाडी होती. पण लोकांना काही तरी नवीन खायला द्यावं म्हणून पनीर चीझ हॉट डॉग पदार्थ सुरु केला. यामध्ये खाली चिझ सॉस, पेरिपेरी सॉस वर थोडा मसाला व पनीर चे देखील काही सॉस आहेत. जे टाकून हे बनवलं जात. याची किंमत ही अगदी सर्वांना परवडेल अशीच आहे. अगदी 60 रुपये मध्ये हा हॉट डॉग मिळतो, असे भक्ती खाडिलकर सांगतात.
advertisement
पुण्यातील सोन्या मारुती चौक, भोरी आळी या ठिकाणी हा प्रसिद्ध युरोपियन पदार्थ मिळतोय. त्याला खवय्यांचा चांगलाच प्रतिसाद आहे. या पदार्थाची चव आणि त्याची किंमत याच बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. आपण अजून हॉट डॉग खाल्लं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 08, 2023 12:53 PM IST