TRENDING:

Kaju Curry : घरच्या घरी बनवा रेस्टोरेंट स्टाईल काजू करी! काही मिनिटांत होईल तयार, सगळे आवडीनं खातील

Last Updated:

How to make perfect restaurant style kaju curry at home : पनीरच्या भाज्या तर घरी बनवता येतात. मात्र काजू करी तितकी परफेक्ट बनत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काजू करीची परफेक्ट रेसिपी सांगत आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुलांना असेल किंवा घराच्या मोठ्या मंडळींना, रेस्टोरंटच्या भाज्या खूप आवडतात. आपण जेव्हा केव्हा बाहेर जेवायला जातो. तेव्हा शाकाहारी लोक बहुतांशवेळा पालक पनीर, पनीर बटर मसाला, बटर पनीर मागवतात. काहीवेळा आपण काजू करी मागवतो. पनीरच्या भाज्या तर घरी बनवता येतात. मात्र काजू करी तितकी परफेक्ट बनत नाही.
रेस्टोरेंट स्टाईल काजू करी बनवण्याची पद्धत..
रेस्टोरेंट स्टाईल काजू करी बनवण्याची पद्धत..
advertisement

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काजू करीची परफेक्ट रेसिपी सांगत आहोत. तुम्ही या पद्धतीने काजू करी बनवाल तर तिची चव अगदी हॉटेलच्या भाजीसारखी येईल. ही रेसिपी saritas_kitchen_marathi या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला पाऊया परफेक्ट काजू करी कशी बनवायची.

रेस्टोरेंट स्टाईल काजू करीसाठी लागणारं साहित्य

- 1/2 वाटी काजू

advertisement

- 4 चमचे तेल

- 1 चमचा आल लसूण पेस्ट

- 2 कांदा

- 2 टोमॅटो

- 1/4 चमचा हळद

- 1/2 चमचा गरम मसाला

- 1/2 चमचा धणे पावडर

- 1/2 चमचा जिरे पूड

- 2 चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर

- 2 हिरवी वेलची

- 2 काळी मिरी

advertisement

- दालचिनी

- 1/2 चमचा जीरे

- मीठ चवीनुसार

- कोथिंबीर

रेस्टोरेंट स्टाईल काजू करी बनवण्याची पद्धत..

- सर्वात आधी गॅस कढई गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये तेल टाका.

- त्यानंतर यामध्ये काजू घालून ते हाकले सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

- त्याचा तेलामध्ये जिरे, काळी मिरी, दालचिनी, वेलची घाला आणि परतून घ्या.

advertisement

- नंतर यामध्ये चिरलेला कांदा घाला. तोही हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.

- त्यानंतर आलं पेस्ट घाला आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्या.

- कांदा आलं परतून होईपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो टाकून त्याची प्युरी तयार करा.

- त्यानंतर अर्धा तास भिजवलेले काजू घ्या आणि त्याचीही पेस्ट बनवा.

- कांदा, आलं, लसूण भाजल्यावर त्यामध्ये टोमॅटोची पुरी टाका आणि तीही कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्या.

advertisement

- त्यानंतर काजूची पेस्ट घालून ती तेल सुटेपर्यंत परता.

- आता त्यामध्ये हळद, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला, काश्मिरी लाल मिरचीचं तिखट घालून परतून घ्या.

- त्यानंतर थोडं पाणी टाकून कोरड्या मसाल्यांचा कच्छपणा जाईपर्यंत परतून घ्या.

- आता यामध्ये तुम्हाला जितकी घट्ट किंवा अपार्टल भाजी हवी असेल, त्याप्रमाणे पाणी घाला.

- आता यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि एक उकळी येऊ द्या.

- त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करा आणि काजू घाला.

- आता कढईवर अर्धवट झाकण ठेऊन 10 मिनिटं हि ग्रेव्ही शिजू द्या.

अशाप्रकारे तुमची परफेक्ट हॉटेल स्टाईल काजू करी तयार आहे. ही तुम्ही चापोट्टी किंवा भातासोबत खाऊ शकता. ही रेसिपी अत्यंत चमचमीत आणि टेस्टी बनते. तुम्हाला आणि तुमच्या घरातील मंडळींना नक्की आवडेल. तर एकदा नक्की बनवा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; 30 रुपयांपासून खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Kaju Curry : घरच्या घरी बनवा रेस्टोरेंट स्टाईल काजू करी! काही मिनिटांत होईल तयार, सगळे आवडीनं खातील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल