संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला भोगीची भाजी, संक्रांतीला तिळगूळाचे लाडू आणि तिळाचा काटेरी हलवा तसं किंक्रांतीला कणकेच्या गोड धिरड्यांची किंवा बेसनाच्या तिखट धिरड्यांची परंपरा आहे. तिळगुळाच्या पदार्थांच्या जोडीला हे धिरडे खाण्याची प्रथा आहे.
Kitchen Tips : लसूण की कांदा, फोडणीत पहिलं काय टाकायचं? क्रम चुकला तर बिघडते चव
2 कप बेसन पीठासाठी एक टिप्सून जिरं, पाव टिस्पून हिंग, 3 मोठ्या पाकळ्या लसूण, 2 हिरवी मिरची. थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
advertisement
हे वाटण एका भांड्यात काढून त्यात थोडं पाणी टाकून त्यात बेसन पीठ, चवीनुसार मीठ आणि हळद टाकून चांगलं मिक्स करून घ्या. 10 मिनिटं ठेवा. पिठावर तुम्हाला बुडबुडे आलेले दिसतील म्हणजे पीठ चांगलं मुरलं आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाका.
गॅसवर तवा ठेवा. त्यावर तेल पसरवून घ्या, जसं डोशासाठी लावतो. तवा तापला की गॅस कमी करा. बेसनचं पीठ टाका आणि डोसा पसरवतो तसाच पसरवून घ्या. कडेने तेल सोडा. कडा सुटू लागल्या की परतवा. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
Tilgul Ladoo : कुकरच्या एका शिट्टीत बनवा मऊसूत तिळगूळ लाडू आणि तिळाची वडी
युट्युब चॅनेलवर हा रेसिपी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा पदार्थ खान्देशात बनवण्याची प्रथा आहे. संक्रांतीला तिळगूळ देत आपण तिळगूळ घ्या गोडगोड बोला असं बोलतो, तसं कंक्रांतीच्या दिवशी मजा म्हणून दिसेल त्याला नावाने हाक मारता आणि दोन धिरडं घ्या आणि गाढवं हाकलून या असं म्हणायचे, असंही या व्हिडीओत सांगितलं आहे.
या धिरड्यासोबत किंक्रांतीला तिळाचे लाडू, डाळीचे लाडू, चुरमुऱ्याचे लाडू देण्याची, खाण्याचीही परंपरा आहे.
