एरवी लोणचं म्हणजे आंबट, तेलकट असतं, त्यामुळे सर्दी-खोकला होईल म्हणून अनेक जण जे खात नाही. पण घोळ लिंबू हा लिंबाच्या लोणच्याचा प्रकार वेगळा आहे. हे औषधी आहे. जितकं जुनं तितकं पौष्टीक. बनवून ठेवलं की 4-5 वर्षे टिकतं. तोंडाला चव नसेल, घरात कुणी आजारी असल तर अशावेळी तुम्ही हे घोळ लिंबू त्याला देऊ शकता. हा घोळ लिंबू प्रेग्नंट महिलांसाठी खास बनवला जातो.
advertisement
Jalebi Recipe Video : गोड आवडत नाही किंवा खायचं नाही, मग बनवा ही तिखट जिलेबी
आता घोळ लिंबू कसा बनवायचा ते पाहू. यासाठी पातळ सालीचे मोठे आणि रसदार असे लिंबू घ्या. लिंबू स्वच्छ धुवून कापडाने पुसून कोरडी करून घ्या. काचेची बरणी धुवून स्वच्छ पुसून तीसुद्धा कोरडी करून घ्या. आता या बरणीत जितके मावतील तितके लिंबू भरा. लिंबू दाबून बरणीत भरायचे नाहीत. ते सुटसुटीत राहतील असेच असावेत.
आता यात मीठ टाका. 4 लिंबू असतील तर 2 चमचे मीठ असं प्रमाण घ्या. बरणीचं झाकण टाकून बरणी हलवून घ्या म्हणजे मीठ त्या लिंबांना लागेल. महिनाभर बरणी अशीच ठेवायची आहे. मधमधे ती हलवत राहा म्हणजे मिठाचं पाणी लिंबाला चांगलं लागेल. पण याचा अर्थ ते खराब झाले असं नाही. हे लोणचं तयार व्हायला वेळ लागतो. जवळपास दीड महिना. काही दिवसांनी तुम्हाला लिंबाचा रंग बदललेला दिसेल. ते गुलाबजामसारखे काळे दिसू लागतील.
Lemon Pickle : परिणिती चोप्रा खाते खास लिंबाचं लोणचं; बिनतेलाचं बनतं, संपूर्ण Recipe Video
Gayatri kulkarni's पाककला युट्युब चॅनेलवर हा रेसिपी व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तुम्ही अशा पद्धतीने घोळ लिंबू बनवून पाहा आणि कसे झाले आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
