नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात असलेले माऊली कढी समोसा हे ठिकाण त्याच्या युनिकनेसमुळे शहरात प्रसिद्ध आहे. लॉकडाऊन नंतर हा कढी समोसा रुपेश गायकवाड यांनी या ठिकाणी विकण्यास सुरू केला. तसेच साधारण समोसा किंवा समोसा पाव तर सगळेच विकतात. पण माऊली कढी समोसाचे मालक रुपेश गायकवाड यांनी हा समोसा ताकापासून तयार केलेल्या कढी सोबत खवय्यांना सर्व्ह करण्यास सुरू केले. अगदी नाशिककरांना देखील या समोशाचा मोह आवरला नाही. त्यामुळे कढी समोशाला मागणी वाढत गेली. हा युनिक फूड आयटम खाण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
advertisement
200 पेक्षा जास्त आजारांवर आहे गुणकारी; अशी पाणीपुरी तुम्ही कधी खाल्लीये का?
कढी समोशाचे वैशिष्ट्य
तसेच समोसा हा वडापाप्रमाणे स्ट्रीटफूड मध्ये लोकप्रिय आहे. अनेक ठिकाणी सिंगल समोसा व समोसा पाव हा चिंचेची चटणी व खोबऱ्याची चटणी सोबत सर्व्ह केला जातो. परंतु माऊली कढी समोसा या ठिकाणी मिळणारा समोसा हा ताकापासून तयार केलेल्या कढीसोबत सर्व्ह केला जातो. या युनिक फूड आयटम फक्त 20 रुपयात या ठिकाणी मिळतो. किंमत अगदी पॉकेट फ्रेंडली असल्यामुळे प्रत्येक वयोगटातील खवय्ये या ठिकाणी येऊन कडी समोशाचा आस्वाद घेतात.
पोटभर बिर्याणी खा फक्त 40 रुपयांत, पण कुठं आहे हे ठिकाण?
दिवसाला 3 हजार समोशांची विक्री
या कढी समोशाला फक्त नाशिक शहरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात मागणी आहे. सुरुवातीला या ठिकाणी दिवसात 100 समोसे सर्व्ह होत होते. कालांतराने नाशिककरांनी कढी समोस्याला आपल्या सकाळच्या आहारात खाण्यास पसंती दर्शवली. त्यामुळे आज या ठिकाणी दिवसाला दोन ते तीन हजार समोसे अनलिमिटेड कढी सोबत सर्व्ह होतात, अशी माहिती माऊली कढी समोसाचे मालक रुपेश गायकवाड यांनी दिली आहे.